आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 घटनांमुळे वाजपेयी ठरले ‘अटल’...मोदींना म्हटले होते- राजधर्माचे पालन करा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजधर्म : मोदींना म्हटले होते- राजधर्माचे पालन करा; बाबरी विध्वंसही चूक असल्याचे म्हटले होते
गुजरात दंगलीच्या वेळी तेव्हाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना पत्रपरिषदेत सोबत घेऊन म्हणाले होते -मोदी, राजधर्माचे पालन करा. दंगलीदरम्यान सरकारच्याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह असल्याने त्यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे होते. अर्थात, मोदींना मुख्यमंत्री करण्याचा निर्णयही त्यांचाच होता. दुसरीकडे, संपूर्ण भाजप जेव्हा बाबरी मशीद विध्वंसाबद्दल आनंदोत्सव साजरा करत होता, तेव्हा ‘हे चुकीचे आहे,’असे म्हणत अटलजींनी त्यावर टीका केली होती.

 

हेही वाचा... गुजरात दंगलीचे शल्य...

 

 

पोखरण : अमेरिका डोळे वटारून पाहत राहिली... आणि भारत अण्वस्त्रसज्ज झाला.
१९९८ मध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर ३ महिन्यांतच अटलजींनी अणुचाचणीचा निर्णय घेतला. अमेरिका विरोधात होती. त्यांची गुप्तचर संस्था उपग्रहाद्वारे निगराणी करत होती. तिला चकवत ११ व १३ मे १९९८ ला पोखरणमध्ये यशस्वी अणुचाचण्या केल्या. नंतर क्लिंटन यांना लिहिले-‘ज्यांची भारताबद्दल वाईट भावना नाही त्यांच्याविरोधात अण्वस्त्रांचा वापर करणार नाही.’

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, कंदाहार : निर्दोषांना वाचवण्यासाठी कट्टर अतिरेकी सोडले व उर्वरित 2 घटनांविषयी...

 

>  खंत वाटणाऱ्या २ गोष्टी, त्यांचा अनेकदा केला उल्लेख

1) पाकिस्तानशी मैत्रीचे प्रयत्न निष्फळ ठरले
अटलजींनी दिल्ली-लाहोर बस सुरू करून भारताला पाकिस्तानशी मैत्री करण्याची इच्छा आहे, असा संदेश जगाला दिला. ते स्वत: या बसमध्ये बसून लाहोरला गेले. त्यांनीच शांतता चर्चेसाठी मुशर्रफ यांना आग्रा येथे बोलावले, पण पाकिस्तानसोबतचे संबंध बिघडत गेले. अटलजींच्या कार्यकाळातच पाकिस्तानशी मैत्री करण्याचे सर्वाधिक प्रयत्न झाले. त्यांनी अनेक प्रसंगी याचा उल्लेख करत खेद व्यक्त केला.

 

2) ‘इंडिया शायनिंग’ झाला नाही, सरकार गेले
२००४ च्या निवडणुकीच्या आधी अटलजींच्या सरकारने ‘शायनिंग इंडिया’चा नारा दिला. नंतर त्यांनी आणि त्यांचे सर्वात घनिष्ठ सहकारी लालकृष्ण अडवाणी यांनी सार्वजनिक मंचावरून कबुली दिली की, शायनिंग इंडियासारख्या चुकीच्या घोषणांमुळे आमचा पराभव झाला आहे. सरकार गेल्यानंतर २००७-२००८ मध्ये अटलजींनी राजकारणातून संन्यास घेण्याची इच्छा जाहीर केली. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली.

 

> आणखी एक रंजक किस्सा... परराष्ट्रमंत्री असताना संपादकांकडे तक्रार

१९७७ मधील गोष्ट. अटलजी परराष्ट्रमंत्री होते. दिल्लीच्या एका वृत्तपत्रात त्यांनी आपली एक कविता छापण्यासाठी पाठवली. पण ती प्रसिद्ध झाली नाही. तेव्हा त्यांनी संपादकांच्या नावे पत्र लिहिले. त्यात कवितेद्वारेच तक्रार पाठवली...

 

अटलजींनी पाठवलेली कविता...
कैदी कवि लटके हुए, सम्पादक की मौज।
कविता हिंदुस्तान में, मन है कांजी हौज।
मन है कांजी हौज, सब्र की सीमा टूटी।
तीखी हुई छपास, करे क्या टूटी-फूटी।
कह कैदी कविराय, कठिन कविता कर पाना,
लेकिन उससे कठिन, कहीं कविता छपवाना।

 

संपादकांनी दिलेले उत्तराचे पत्र...
कह जोशी कविराय, सुनो जी अटल बिहारी।
बिना पत्र के कविवर, कविता मिली तिहारी।
कविता मिली तिहारी, साइन किन्तु न पाया।
हमें लगा चमचा कोई, खुद ही लिख लाया।
कविता छपे आपकी, यह तो बड़ा सरल है।
टाले से कब टले, नाम जब स्वयं अटल है।

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...