Home | Gossip | When Bollywood Actors Lost Control During The Shooting Of Scenes

इंटीमेट सीन वेळी जेव्हा कलाकारांचा सुटला स्वतःवरचा ताबा, असे आहेत हे 8 बॉलिवूड चित्रपट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 12:22 AM IST

कॅमे-यांच्या नजरा सतत कलाकारांवर खिळल्या असतात.

 • When Bollywood Actors Lost Control During The Shooting Of Scenes

  मुंबईः बॉलिवूड चित्रपटांमध्ये इंटीमेट सीन शूट करणे अतिशय कठीण काम असते. कॅमे-यांच्या नजरा सतत कलाकारांवर खिळल्या असतात. अशावेळी सेटवर कास्ट आणि क्रू मेंबर्सच्या उपस्थितीत अभिनेता-अभिनेत्रीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. इतकेच नाही तर कधी कधी इंटीमेट सीन शूट करताना कलाकारांचा स्वतःवरचा ताबासुद्धा सुटतो आणि अभिनेत्रीला लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. अनेकदा दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरसुद्धा अभिनेते त्यांच्यासोबतच्या अभिनेत्रीसोबत इंटीमेट होतानाच्या घटना सेटवर घडल्या आहेत. एक नजर टाकुया बॉलिवूडच्या अशाच 8 प्रकरणांवर...

  1. विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित
  फिल्म : दयावान (1988)

  डायरेक्टर फिरोज खान यांच्या या चित्रपटात विनोद खन्नाने माधुरी दीक्षितसोबत इंटीमेट सीन दिला होता. असे म्हटले जाते, की हा सीन शूट करताना विनोद खन्ना एवढे अनकंट्रोल झाले होते, की त्यांनी माधुरीच्या ओठांचा चावा घेतला होता. जेव्हा हा चित्रपट रिलीज झाला, तेव्हा इंटीमेट सीनवरुन माधुरीवर चांगलीच टीका झाली होती. नंतर माधुरीनेसुद्धा अशाप्रकारचा इंटीमेट सीन शूट केल्याबद्दल खंत व्यक्त केली होती.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, अशाच आणखी 7 घटना..

 • When Bollywood Actors Lost Control During The Shooting Of Scenes

  डिंपल कपाडिया आणि विनोद खन्ना  
  फिल्म :प्रेम धरम

  डायरेक्टर महेश भट यांच्या या चित्रपटात विनोद खन्ना आणि डिंपल कपाडिया यांनी एक इंटीमेट सीन दिला होता. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाच्या या सीनच्या शूटिंगवेळीदेखील विनोद खन्ना यांचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि ते कट म्हटल्यानंतरसुद्धा बराच काळ डिंपलला Kiss करत राहिले होते. या घटनेनंतर डिंपलला चांगलाच मानसिक धक्का बसला होता. महेश भट यांनी यासाठी डिंपलकडे माफीसुद्धा मागितली होती. त्यानंतर हा चित्रपट डबाबंद झाला आणि अद्याप रिलीज झाला नाही.  

 • When Bollywood Actors Lost Control During The Shooting Of Scenes

  फरयाल आणि प्रेम नाथ 
  फिल्म : गोल्ड मेडल (1969)

  रविकांत नगाइच दिग्दर्शित या चित्रपटातील प्रेम नाथ आणि फरयाल यांच्यावर चित्रीत झालेल्या इंटीमेट सीनची बरीच चर्चा झाली होती. रिपोर्ट्सनुसार, प्रेम नाथ यांचा सीनच्या शूटिंगवेळी स्वतःवरचा ताबा सुटला आणि ते फरयावर बळजबरी करु लागले होते. यावेळी फरयालने प्रेम थान यांचे चुंबन टाळण्यासाठी बराच संघर्ष केला होता.  

 • When Bollywood Actors Lost Control During The Shooting Of Scenes

  रंजीत आणि माधुरी दीक्षित 
  फिल्म : प्रेम प्रतिज्ञा (1989)  

  हा चित्रपट बापू (सत्तिराजू लक्ष्मी नारायण) यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटातील एका दृश्यात रंजीत माधुरीवर बलात्कार करतो.  रिपोर्ट्सनुसार, या सीनच्या शूटिंगवेळी रंजीत अनकंट्रोल झाले होते आणि त्यांनी प्रत्यक्षात माधुरीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता.  सेटवर उपस्थित लोकांनी माधुरीची रंजीतच्या तावडीतून सुटका केली होती. या घटनेनंतर माधुरी प्रचंड घाबरी होती आणि तिने रंजीतला तिला स्पर्श न करण्याची सक्त ताकिद दिली होती.

 • When Bollywood Actors Lost Control During The Shooting Of Scenes

  दलीप ताहिल आणि जया प्रदा
  रिपोर्ट्सनुसार, एकदा एका चित्रपटातील बलात्काराच्या दृश्याच्या चित्रीकरणादरम्यान दलीप ताहिल जयाप्रदा यांच्यावर प्रत्यक्षात बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी जयाप्रदा यांना दलीप यांचा हेतू लक्षात येताच त्यांनी त्यांच्या कानशिलात लगावली होती. हा सीन नेमका कुठल्या चित्रपटासाठी शूट करण्यात आला होता, याची माहिती उपलब्ध नाहीये. दलीप आणि जया यांनी  'आखिरी रास्ता' या चित्रपटात एकत्र शेवटचे काम केले होते. हा चित्रपट 1986 साली रिलीज झाला होता.

 • When Bollywood Actors Lost Control During The Shooting Of Scenes

  जॅकलीन फर्नांडीस आणि सिद्धार्थ मल्होत्रा 
  फिल्म : अ जेंटलमन (2016)
  राज निदिमोरु आणि कृष्णा डीके दिग्दर्शित या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलीन फर्नांडीस यांच्यावर एक किसींग सीन चित्रीत करण्यात आला होता. रिपोर्ट्सनुसार, सीनच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरसुद्धा सिद्धार्थ आणि जॅकलीन एकमेकांना किस करत राहिले होते.  

   

 • When Bollywood Actors Lost Control During The Shooting Of Scenes

  रुस्लान मुमताज आणि चेतना 
  फिल्म :आई डोंट लव यू (2013)

  दिग्दर्शक अमित कसारिया यांच्या या चित्रपटातील इंटीमेट सीनच्या शूटिंगदरम्यान रुस्लान मुमताजचासुद्धा स्वतःवरचा ताबा सुटला होता. त्याने अनकंट्रोल होऊन अभिनेत्री चेतना पांडेच्या ड्रेसची चेन उघडली होती. यामुळे चेतनाचा ड्रेस खांद्यावर खाली घसरला होता. या घटनेनंतर रुस्लानला चेतनाची माफी मागावी लागली होती. 

   

 • When Bollywood Actors Lost Control During The Shooting Of Scenes

  रणबीर कपूर आणि इवलिन शर्मा 
  फिल्म :ये जवानी है दीवानी (2013)

  अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर आणि इविलन शर्मा यांच्यावर एक इंटीमेट सीन चित्रीत करण्यात आला होता. शूटिंगदरम्यान रणबीरला दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरसुद्धा तो इवलिनला किस करत राहिला होता.  

   

Trending