• Home
  • Bollywood
  • News
  • When 'Chhichore' film becomes hit, Sushant's 'drive' gets buyers, now the movie will be released on Netflix.

अपकमिंग / 'छिछोरे' चित्रपट हिट होताच सुशांतच्या 'ड्राइव्ह' मिळाले ग्राहक, आता नेटफ्लिक्सवर रिलीज होईल चित्रपट 

करण जोहरला हवी होती मोठी रक्कम

Sep 21,2019 04:52:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : बॉक्स ऑफिसवर चित्रपट 'छिछोरे' हिट झाल्यानंतर सुशांत सिंह राजपूतचा अडकलेला चित्रपट 'ड्राइव्ह' ला ग्राहक मिळालेला आहे. करण जोहरने शुक्रवारी संध्याकाळी ट्विटरवर ही माहिती शेअर केली. आता हा चित्रपट नेटफ्लिक्सवर येईल. मात्र त्याने चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केलेली नाही. चित्रपट जोहरच्या धर्मा प्रोडक्शन बॅनरखाली बनलेला आहे.


करण जोहरला हवी होती मोठी रक्कम...
सांगितले जाते आहे की, 'ड्राइव्ह' दोन वर्षांपासून बनून तयार झाला आहे. याचवर्षी जानेवारीमध्ये याचा टीजरदेखील आला होता, ज्यानुसार, हा 28 जूनला रिलीज होणार होता. पण असे होऊ शकले नाही. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाला डिस्ट्रीब्यूटर्स आणि एग्जिबटर्स मिळत नव्हते. ट्रेडच्या तज्ञांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, करण जोहर जेवढे पैसे मागत होता, ते डिस्ट्रीब्यूटर्स आणि एग्जिबटर्सला खूप जास्त वाटत होते. त्यामुळे कुणीही यामध्ये पडायला तयार नव्हते.


सुशांतचे फ्लॉप चित्रपटदेखील ठरले कारण...
'एम.एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी' नंतर सुशांतने बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपट ('राबता', 'वेलकम टू न्यूयॉर्क', 'केदारनाथ' आणि 'सोन चिड़िया') दिले. त्यामुळे लोकदेखील त्याचण्या चित्रपटात रस घेत नव्हते. आता 'छिछोरे' ने 100 कोटींपेक्षा जास्तच कलेक्शन केले आहे तर खरेदी करणाऱ्यांनी 'ड्राइव्ह' मध्ये इंटरेस्ट दाखवला आहे. करणने नेटफ्लिक्ससोबत अनेक चित्रपट आणि वेब शोचा करार केला आहे. यामुळेच त्याने 'ड्राइव्ह' ला डिजिटल प्लॅटफॉर्मवर विकला.


हे आहे करणच्या जवळच्या व्यक्तीचे म्हणणे...
जोहरच्या जवळच्या लोकांनी सांगितले की, या चित्रपटाबद्दल त्याचे व्हिजन वेगळे होते. हा अॅक्शन आणि हाईएस्ट जॉनरचा चित्रपट आहे. त्याची इच्छा होती की, इंडियासोबत बाहेरच्या ऑडियंससाठीही प्रदर्शित केला जाईल. हेच कारण आहे की, त्याने हा चित्रपट केवळ थिएटर्समध्ये आणण्याऐवजी डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे 90 पेक्षा जास्त देशांपर्यंत जाण्याचे प्रयोजन आहे. त्याला पाहायचे आहे की, त्याच्या या प्रयोगाला कसा रिस्पॉन्स मिळतो. तरुण मनसुखानीच्या दिग्दर्शनात बनलेल्या 'ड्राइव्ह' चित्रपटात सुशांतसोबत जॅकलिन फर्नांडिस, बोमन ईरानी आणि पंकज त्रिपाठी यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

X