आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहान मुलांनी अचानक झाडू हाती घेणे सामान्य बाब नाही, यामागे दडलेले असतात हे संकेत!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलिजन डेस्क - घरात लहान मुले असतील तर कायम गोंधळ सुरू असतो. आपल्या खोडकरपणामुळे ही निरागस मुले सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आणत असतात. कधी-कधी ही मुले आपल्या आईला पाहून झाडू हाती घेतात आणि घराची साफसफाई करू लागतात. ही आपल्याला सामान्य बाब वाटत असेल, परंतु शास्त्रानुसार याचे खूप महत्त्व आहे.


शास्त्रानुसार, जर घरातील लहान मुलाने अचानक झाडू उचलून घराची साफसफाई सुरू केली, तर याचे अनेक संकेत असतात. असे मानतात की, बालकांनी असे अचानक केल्यावर एखादा पाहुणा येण्याची शक्यता असते. असेही म्हणतात की, तुमच्या घरी येणारा पाहुणा हा आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी लाभाचा सिद्ध होईल.


झाडूला लक्ष्मीचे रूप मानण्यात येते. जर तुमच्या लहान मुलाने अचानक झाडू हाती घेतला, तर याचा अर्थ लक्ष्मीचा तुमच्या घरात वास असणार आहे. यामुळे घरात कधीही पैशांची कमतरता येणार नाही.


झाडूबद्दल अनेक मान्यता आहेत. असेही म्हणतात की, घरात झाडू कधीही उभा ठेवू नये, असे केल्याने अशुभ होते. तसेच झाडू उभा ठेवल्याने शत्रूंच्या संख्येत वाढ होते.

यासोबतच झाडू मोकळ्या जागेवर ठेवला नाही पाहिजे. तो अशा जागी असावा जेथे कुणाचीही नजर जाणार नाही, खासकरून तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांची.  

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, शास्त्रानुसार मान्यता... 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...