Home | Gossip | when daughter call him uncle, actor sanjay datt was very angry, shared a memory

जेव्हा आपल्याच मुलीने अंकल म्हणून मारली हाक तेव्हा रागाने लालबुंद झाला होता संजय दत्त, पत्नीला जबरदस्त फटकारले होते 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 16, 2019, 01:10 PM IST

हॉस्पिटलमध्ये होती पहिली पत्नी आणि संजय दत्त मुलीसाठी आपल्या सासू सासऱ्यांशी भांडत होता... 

 • when daughter call him uncle, actor sanjay datt was very angry, shared a memory

  मुंबई : संजय दत्तची नवी फिल्म 'कलंक' 17 एप्रिलला रिलीज होणार आहे. यादरम्यानचव त्याचा एक जुना इंटरव्यू मीडियामध्ये व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने पहिली पत्नी ऋचा शर्मासोबत आपल्या सेपरेशनबद्दल सांगितले होते. 1993 मध्ये दिलेल्या या इंटरव्यूमध्ये संजयने सेपरेशनसाठी ऋचाला जबाबदार ठरवले होते. त्याने हेही मान्य केले की, त्याला त्यावेळी ऋचाचा खूप राग आलेला होता, जेव्हा त्याची स्वतःचीच मुलगी त्रिशालाने त्याला डॅडीऐवजी अंकल म्हणून हाक मारली होती.

  ऋचावर जबरदस्त भडकला होता संजय दत्त...
  संजय दत्तने इंटरव्यूमध्ये भडकून सांगितले होते, "मला ऋचाचा खूप राग आला होता आणि मी त्याबद्दल तिला विचारले. जर मी माझ्या आसपास नव्हतो तर तेव्हा ऋचाची जबाबदारी नव्हती का की, तिने तिच्या मनात माझ्या आठवणी जिवंत ठेवाव्या. मी ऋचाला म्हणालो की, जर मी तिच्या जागी असतो आणि सिचुएशन उलटी असती तर मी मुलीच्या मनात तिला नक्की जजिवंत ठेवले असते."

  ऋचाच्या पेरेंट्सवरही चिडला संजय...
  संजयने पुढे सांगितले, "मला आठवते जेव्हा ती दवाखान्यात होती, तेव्हा तिच्या पेरेंट्सने मला विचारले होते की, 'त्रिशालाचे काय करणार ?' मी विचारले, 'काय करणार म्हणजे ?' ते म्हणाले की, त्यांना त्रिशालाला आपल्यासोबत ठेवायचे आहे. मी म्हणालो, 'तुम्ही अशापद्धतीने का बोलत आहात ? ऋचा जिवंत आहे, ती अजून मेलेली नाही."

  त्रिशालाच्या कस्टडीसाठी लढायला संजयने दिला होता नकार...
  - जेव्हा संजय दत्तला विचारले गेले की, त्याने त्रिशालाच्या कस्टडीसाठी फाइट केली होती का ? तेव्हा तो म्हणाला, "किती भांडायचे होते ? मी प्रयत्न केले होते. सध्या मला माझ्या मुलीची कस्टडी नको आहे. पण जे असेल, मला जेव्हा वाटेल तेव्हा मला तिला भेटण्याची लिबर्टी हवी आहे." संजय दत्तने 1987 मध्ये ऋचा शर्मासोबत लग्न केले होते. 1988 मध्ये त्यांची मुलगी त्रिशालाचा जन्म झाला होता आणि त्यांच्या 8 वर्षांनंतर ब्रेन ट्यूमरने ऋचाचा मृत्यू झाला होता.
  - असे म्हणले जाते की, माधुरी दीक्षितसोबतच्या अफेयरमुळे संजू आणि ऋचा यांच्या नात्यात अंतर आले होते. ऋचाची बहीण अॅनाने तर एका इंटरव्यूमध्ये हेही म्हणले होते की, माधुरीच्या प्रेमात वेडा झालेला संजय कॅन्सरग्रस्त पत्नीला घेण्यासाठी एअरपोर्टवरदेखील आला नव्हता. ऋचाच्या मृत्यूनंतर संजूला रिया पिल्लईची साथ मिळाली. दोघांनी 1998 मध्ये लग्न केले, पण हे लग्न जास्त दिवस टिकू शकले नाही आणि त्यांनी 2005 मध्ये घटस्फोट घेतला.
  - रियापासून वेगळे झाल्यानंतर संजयने मान्यतासोबत तिसरे लग्न 2008 मध्ये केले, जिच्याकडून त्याला 2 जुळी मुले शाहरान आणि इकरा झाले. त्याची मुलगी त्रिशाला 31 वर्षांची झाली आहे आणि दोघांमध्ये खूप चांगली बॉन्डिंग आहे.

Trending