आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीची सटकते तेव्हा: ग्राउंडवर काढला कुलदीपवर राग; चुपचाप Bowling करणार की देऊ दुस-याला?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - आशिया चषकात भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रोमांचक सामना झाला. अफगाणिस्तानने 252 रन बनवे. तर भारतीय संघाने सुद्धा सर्वबाद 252 धावा काढल्या. अफगाणिस्तान आशिया कपमधून बाहेर पडला. परंतु, या टीमने दिलेली जबरदस्त परफॉर्मन्स कुणी विसरू शकणार नाही. सुपर-4 मध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ठ बॅटिंग आणि बॉलिंग केली आहे. भल्या-भल्या टीमला जिंकण्यासाठी मोठा संघर्ष करण्यास भाग पाडले. त्यातच पुन्हा टीम इंडियाचे कर्णधार पद स्वीकारलेला एमएस धोनी सुद्धा चर्चेत राहिला. टीम इंडियाची गोलंदाजी सुरू असताना कॅप्टन कूलने आपल्या राउडी वर्तनातून सर्वांना हैराण केले. भर मैदानात सर्वांसमोर तो कुलदीपवर बरसला. नीट बॉलिंग करशील की दुसऱ्याला देऊ अशी धमकी देताना धोनी दिसून आला आहे. धोनीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 

Kuldeep asked to change the Fielder

Dhoni replied: Bowling Karega ya bowler change karen

That’s why Dhoni is the best captain ever. He’s mentally too strong & very confident on his decisions👍🏻
Video credits : @imransiddique89 #AsiaCup2018 #INDvAFG
pic.twitter.com/nND9kpTK4i

— HAMAS 🇵🇰 (@HamasulGhani) 25 September 2018

 

काय आहे व्हिडिओमध्ये..?
व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येते की कुलदीप यादव गोलंदाजी करत होता आणि फील्डिंगवर खुश नव्हता. त्याने धोनीला हातवारे करून फील्डरची प्लेसमेंट करण्यास सांगितले. यावर धोनी अचानक भडकला आणि ओरडून सांगितले, 'बॉलिंग करशील की दुसऱ्याला देऊ?' यानंतर कुलदीप चुपचाप निघून गेला आणि बॉलिंग टाकण्यास सुरुवात केली. धोनी फील्डिंगसाठी नेहमीच कॉन्फिडेंट असतो. त्याने फील्डर ज्या ठिकाणी थांबवले, बॉल त्याच ठिकाणी जात असल्याचे दिसून आले. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात सुद्धा त्याने रोहित शर्माला फील्डिंगमध्ये बदल करण्यास सांगितले होते. त्यानंतर चेंडू त्याच फील्डरकडे गेला होता आणि एक विकेट सुद्धा मिळाली.

 

बातम्या आणखी आहेत...