Home | Khabrein Jara Hat Ke | when doggy baby sits girl Video get viral on internet

डॉगीने असे करताच रडू लागले बाळ, नंतर त्या डॉगीने जे केले ते पाहून सर्वांनाच वाटत आहे आश्चर्य

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 10, 2019, 12:00 AM IST

या डॉगीचा हा व्हिडिओ अडिच कोटी वेळा पाहिला गेला आहे.

 • when doggy baby sits girl Video get viral on internet

  एनिस - आयर्लंडमध्ये राहणारा एका पाळीव कुत्रा चार्ली सध्या इंटरनेटवर व्हायरल होतोय. चार्लीचा एक व्हिडिओ यूट्यूबवर अडीच कोटीपेक्षा जास्तवेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओमध्ये चार्लीमुळे मालकाची सहा महिन्यांची मुलगी रडायला लागते. पण त्यानंतर तिला शांत करण्यासाठी चार्ली जे काही करतो ते पाहून सगळेच खुश होतात. हा व्हिडिओ पाहणाऱ्यांनी चार्लीच बाळाची सर्वात चांगली आया असल्याचे म्हटले आहे.

  पुढे वाचा, नेमके काय झाले..

 • when doggy baby sits girl Video get viral on internet

  रडणाऱ्या मुलीला शांत करतो चार्ली.. 
  - आयरलंडच्या एनिस शहरातील डॅनियल डेर्जेविकी आणि ज्युलिया यांचा पाळीव कुत्रा चार्ली यांची ही स्टोरी आहे. 'बीगल' प्रजातीचा हा डॉगी कपलने तो अगदी लहान असताना आणला होता. 
  - तो त्यांच्या घरात एवढा रुळला की, त्यांच्या घरातील सदस्य बनला. नंतर या कपलला एक मुलगी झाली तिचे नाव 'लॉरा' ठेवण्यात आले. 
  - डॉगीचा इंटरनेवर व्हायरल होणारा व्हिडिओ एप्रिल 2014 मध्ये अपलोड करण्यात आला होता. याच चार्ली आणि सहा महिन्यांची लॉरा दिसत आहेत. चार्ली लॉराचे आवडचे खेळणे घेतो तेव्हा ती रडू लागते हे व्हिडिओत दिसत आहे. 
  - नंतर चार्ली तिला शांत करण्यासाठी प्रयत्न सुरू करतो आणि एकापाठोपाठ एक तिला अनेक खेळणी आणून देतो. नंतर ती शांत झाल्यावर तिला किसही करतो. 
  - हा व्हिडिओ अडीच कोटी वेळा पाहिला गेला आहे. चार्ली लॉराची बेस्ट आया असल्याच्या कमेंट्स लोक करत आहेत. 

 • when doggy baby sits girl Video get viral on internet
 • when doggy baby sits girl Video get viral on internet
 • when doggy baby sits girl Video get viral on internet

Trending