आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंभीरने लावली टिकली आणि डोक्यावर घेतली ओढणी, जाणून घ्या का दिसला या अवतारामध्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - येथील एका कार्यक्रमात क्रिकेटर गौतम गंभीर एका वेगळ्या अवतारात पाहायला मिळाला. यावेळी गंभीरच्या कपाळावर टिकली लावलेली होती. तसेच त्याने डोक्यावर ओढणीही ओढलेली होती. गौतम गंभीरने नुकतीच नवी दिल्लीत हिजडा हब्बा या कार्यक्रमात उपस्थिती लावली. त्यावेळी त्याने हा अवतार धारण केला होता. 


गौतम गंभीर हा अनेकदा सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत असतो. सोशल मीडियावरून तो वारंवार त्याबाबत माहिती देत असतो. तृतीयपंथी किंवा LGBT कम्युनिटीबद्दलही त्याने अनेकदा स्पष्टपणे त्याचे मत मांडले आहे. त्याचमुळे दिल्लीतील एका मॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात आमंत्रित केल्यानंतर गंभीरने याठिकाणी उपस्थितीती लावली. या ठिकाणी तृतीयपंथीय सदस्यांनी विविध सादरीकरणही केले. पण गौतम गंभीरने घेतलेली ओढणी आणि कपाळावर लावलेली टिकली सर्वाधिक आकर्षणाचे कारण ठरली. 

 

पुढे पाहा, या कार्यक्रमाचे काही PHOTOS

बातम्या आणखी आहेत...