आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 मिनिटांच्या अंतरावर होते पप्पा धर्मेंद्र यांचे घर, परंतु ईशा देओलला तेथे जाण्यास लागली 34 वर्षे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सनी देओल 62 वर्षांचा होत आहे. हे सर्वांना माहिती आहे की, 19 ऑक्टोबर 1956 रोजी सहनेवाल, पंजाबमध्ये जन्मलेल्या सनी देओल आणि त्याची सावत्र आई हेमा मालिनीमध्ये कधीच नॉर्मल नाते राहिले नाही. एवढेच काय, सनी आणि त्याचे भाऊ हेमाच्या दोन्ही मुली ईशा आणि अहानाच्या लग्नातही सहभागी झाले नव्हते. दुसरीकडे, हेमा मालिनीनेही लग्नानंतर कधीही धर्मेंद्रच्या घरात पाऊल ठेवले नाही. परंतु तुम्हाला माहिती आहे का, हेमाची मोठी मुलगी ईशाने एकदा सनी देओलला फोन केला होता आणि त्यांच्या घरीही गेली होती. 

 

असा आहे तो किस्सा...
- राम कमल मुखर्जी यांचे पुस्तक 'हेमा मालिनी : बियॉन्ड द ड्रीम गर्ल'मध्ये या घटनेचा उल्लेख आहे. पुस्तकानुसार, ईशा धर्मेंद्रच्या घरात पाऊल ठेवणारी हेमा मालिनीची एकमेव फॅमिली मेंबर आहे. वास्तविक, धर्मेंद्रचा भाऊ आणि अभय देओल यांचे वडील अजितसिंह देओल खूप जास्त आजारी होते आणि अंथरुणाला खिळून होते. ईशाला आपल्या काकांना पाहायचे होते. पुस्तकात ईशाच्या हवाल्याने लिहिण्यात आले आहे की, "मला काकांना भेटायचे होते आणि माझ्याकडून त्यांना रिस्पेक्ट देण्याची इच्छा होती. ते मला आणि अहानाला खूप जीव लावायचे. आम्हीही अभयच्या खूप जवळ होतो." ईशाने पुढे सांगितले की, "आमच्याकडे त्यांच्या घरी जाण्याशिवाय इतर कोणताही पर्याय नव्हता. ते हॉस्पिटलमध्येही नव्हते, की आम्ही तेथे भेटू शकलो असतो. म्हणून मी सनी भैयाला फोन केला आणि त्यांनी सगळे जुळवून आणले."

 

मुलीला वडिलांच्या घरी जाण्यास लागली 3 दशके
- हेमा मालिनीचा बंगला आदित्य धर्मेंद्रच्या 11th रोड हाउसपासून 5 मिनिटांच्या अंतरावर आहे. परंतु ईशाला तिथपर्यंत जाण्यासाठी तब्बल 34 वर्षे लागली.
- तथापि, ईशाचा जन्म 1981 मध्ये झाला होता आणि ते आपल्या वडिलांच्या घरी 2015 मध्ये गेली. या भेटीदरम्यान ईशाने धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांच्याही पहिल्यांदाच भेट घेतली. ईशानुसार, "मी त्यांना पदस्पर्श केला आणि त्या मला आशीर्वाद देऊन तिथून निघून गेल्या. तथापि, काही महिन्यांच्या आजारानंतर 23 ऑक्टोबर 2015 रोजी अजितसिंह देओल यांचे निधन झाले. ते गॉल ब्लॅडर कॉम्प्लिकेशनची ट्रीटमेंट घेत होते.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos आणि Video ...  

 

 

 

बातम्या आणखी आहेत...