आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पेशल डेस्क - देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून ज्यांचा नेहमी उल्लेख होतो त्या राजीव गांधींची आज 75वी जयंती आहे. सन 1991 मध्ये तामिळनाडूच्या श्रीपेरंबदूरमध्ये एका आत्मघाती हल्ल्यात त्यांची हत्या करण्यात आली होती. भारताच्या पंतप्रधानांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे देशभरात शोककळा पसरली. परंतु यापूर्वीही राजीव गांधींवर हल्ला झाला होता. हा हल्लाही श्रीलंकेशी निगडित होता. आणि तो एका श्रीलंकन सैनिकाने केला होता.
सैनिकाने बंदुकीच्या दस्त्याने केला प्रहार
29 जुलै 1987 ही तारीख इतिहासात भारतीय पंतप्रधानावर झालेल्या एकमेव विदेशी हल्ल्याचा दिवस म्हणून नोंदलेली आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी श्रीलंकेत तामिळ समस्या आणि शांततेसाठी खूप काम केले. 1987 मध्ये भारत आणि श्रीलंकेत शांततेचा करार झाला. यासाठी राजीव गांधी कोलंबोत पोहोचले. तेथे त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला जात होता. दरम्यान, अचानक एका सैनिकाने त्यांच्यावर हल्ला चढवला. नौसैनिक विजिथा रोहन विजेमुनी याने पीएम राजीव गांधींवर बंदुकीच्या दस्त्याने प्रहार केला. राजीवजी वेळेवर झुकले, परंतु त्यांना वार बसला. परंतु तो जास्त जोरात बसला नाही. यानंतर राजीव गांधींना लगेच गार्डसनी घेरले. हा भारताच्या पंतप्रधानांवर एकमेव विदेशी हल्ला होता.
हल्लेखोर सैनिकाला 6 वर्षांची कैद
राजीव गांधींवर हल्ला करणाऱ्या विजेमुनीला अटक करण्यात आली. यानंतर त्याचे कोर्ट मार्शल झाले. त्याला 6 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तुरुंगातून सुटल्यानंतर विजेमुनी एक ज्योतिषी बनला. 2015 मध्ये त्याने पीएम मोदींना श्रीलंकेच्या अंतर्गत प्रकरणांत दखल न देण्याचा इशारा दिला होता.
का केला हल्ला?
श्रीलंकेत गृहयुद्ध सुरू होते. सिंहला लोक समझौत्याला विरोध करत होते. बौद्ध धर्म मानणारे सिंहला आणि हिंदू तमिळांमध्ये घमासान सुरू होती. श्रीलंकन सैना आणि अनेक हत्यारबंद तमिळ संघटना आपसात भिडत होत्या. दुसरीकडे श्रीलंकेच्या दक्षिणेला जनाथा विमुक्ती पेरामुनाने सशस्त्र बंड पुकारला होता. भारत-श्रीलंका समझौत्यात स्थानिक सरकार तमिळ हिंदूंना अधिक स्वायत्तता आणि अधिकार द्यायला तयार झाली. याबदल्यात तमिळ संघटनांना आपला सशस्त्र बंड बंद करायचा होता. तज्ज्ञ मानतात की, श्रीलंकेला फाळणीपासून वाचवण्यासाठी हा समझौता गरजेचा होता. भारत-श्रीलंकेदरम्यान झालेल्या समझौत्याचे फोटो टीव्हीवर दिल्लीतील 5 स्टार हॉटेलच्या रूम नंबर 518 मध्ये बसलेल्या लिबरेशन टायगर्स तमिळ ईलम तमिळ (लिट्टे) प्रमुख व्ही. प्रभाकरन याने पाहिले. त्याने समझौत्याला विरोध केला. यानंतर त्याने राजीव गांधींच्या हत्येचा कट रचला. तथापि, 1984 पासून या करारासाठी प्रयत्न सुरू होते. राजीव गांधींनी शांततेसाठी सैन्य पाठवले. परंतु सैन्य युद्धामध्ये गुंतले. संघर्षात हजारो श्रीलंकन जवान मारले गेले. दुसरीकडे शांती सैनिकांच्या रूपात श्रीलंकेत गेलेल्या तब्बल 1500 भारतीय सैनिकांनाही जीव गमवावा लागला होता.
भारताने सैन्य पाठवल्याने आणि समझौत्यामुळे नाराज झालेल्या विजेमुनीने राजीव गांधींवर हल्ला केला. विशेष म्हणजे सरकारी दलांनी 18 मे 2009 रोजी लिट्टे प्रमुख व्ही. प्रभारकनचा खात्मा केला होता. यासोबतच 37 वर्षांपासून सुरू असलेले युद्ध संपुष्टात आले होते, यात तब्बल 1 लाख लोकांचे प्राण गेल्याचे सांगितले जाते.
पुढच्या स्लाइडवर पाहा, श्रीलंकेचा हल्लेखोर सैनिक विजेमुनीचा फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.