आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • When It Cost $ 4000 To Renovate The $ 350 Dollar Ring, Then Where To Prepare For The Wedding

३५० डॉलरची रिंग नाकारून सहलीवर केला ४००० डॉलर खर्च, तेव्हा कुठे लग्नास तयार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - प्रेमात पैशाला फार महत्त्व नसले तरी काहींना एंगेजमेंटसाठी महागाची सोन्याची अंगठी  दघ्यावी वाटते. हीच बाब येथील एका डॉक्टरच्या लक्षात आली नव्हती. त्याने आपल्या प्रेयसीला तिच्या आवडत्या रेस्तराँमध्ये ३५० डॉलरची अंगठी देऊन लग्नाची मागणी घातली.  पण प्रेयसीने आधी होकार दिला पण अंगठीची किंमत पाहून तिचा प्रियकर कंजूष निघाला, याचे तिला वाईट वाटले. डॉक्टर असूनही तो आपल्यासाठी इतकी कंजुषी का करतो आहे? याचे तिला दु:ख झाले. तिने त्याला मला महागडी अंगठी आणून दे अन्यथा लग्नाचे विसरून जा, अशी सरळ धमकीच दिली.

 

डॉक्टर असूनही एका दिवसाच्या पगाराइतकी रिंग आणू शकला नाही, याचे दु:ख

मुलीने सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टवर लिहिले, मी व माझा डॉक्टर बॉयफ्रेंड तीन वर्षांपासून एकत्र असून आमचे एकमेकावर प्रेम आहे. त्याला कोणते कर्ज नाही. पैसेही चांगले मिळवतो. परंतु त्याने माझ्यासाठी खूपच कमी किंमतीची सोन्याची अंगठी आणली. साहजिकच याचा मला खूप राग आला. सोन्याच्या अंगठीतला हिरासुद्धा खूप लहान आकाराचा होता. तो पाहून कोणालाही लाज वाटेल, अशीच त्याची खरेदी होती. मी त्याला विचारले, अंगठींची किंमत काय आहे? तेव्हा त्याने असा आर्विभाव केला, जशी ती लाखों डॉलर किंमतींची आहे. तो म्हणाला, ज्वेलर्सने मला ती १ हजार डाॅलरची अंगठी असल्याचे सांगितले. पण मी त्याला ३५० डॉलरमध्ये देण्यास सांगितले. तो तयार झाला. पण मला त्याच्या खोटे बोलण्याचाही राग आला. तो माझ्यावर खूप प्रेम असल्याचा दावा करतो. पण त्याच्या एक दिवसाच्या पगाराइतकी रिंग आणून देऊ शकत नाही, याचे वाईटही वाटले.मी त्याला म्हटले, तू मला लग्नाची मागणी घातली, त्याचा मी आदर करते. मलाही तुझ्यासोबत लग्न करण्याची इच्छा आहे. पण ही अंगठी मला आवडलेली नाही. ती तू बदलून आणून दे. कारण ती खूपच स्वस्त दर्जाची आहे. तो म्हणाला, लग्नासाठी बचत करतो आहे. पण मी त्याला बजावले, मला चांगली अंगठी आणलास तरच लग्न देईन, अन्यथा विसरून जा. परंतु त्याने अंगठी ऐवजी मला लास वेगासला ट्रीपवर नेले. त्यासाठी चार हजार डॉलर खर्च केला. मला ठाऊक आहे, तो कसा आहे. 

 

अशी झाली टीका

> या मुलीच्या बोलण्यावरून तिला सोन्याची खाण हवी असे वाटते. लग्नासाठी कोणाचे प्रेम नको. 
> लग्नापेक्षा तिचा अंगठीत खूप जीव आहे. अशा मुलीशी लग्न करावे का? 
> या जोडप्यांनी लग्नच करू नये. उलट त्याने पैशापेक्षा नात्याला महत्व देणारी दुसरी मुलगी शोधावी हे चांगले. तीच याला खरे प्रेम देईल.