आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबईः बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते कादर खान आता आपल्यात नाहीत. 31 डिसेंबरच्या संध्याकाळी सहाच्या सुमारास 81 वर्षीय कादर खान यांनी अखेरचा श्वास घेतला होता. कॅनडातील एका रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. कादर खान यांनी खलनायकाच्या रुपात सिनेसृष्टीतील करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी विनोदी आणि चरित्र भूमिका वठवल्या होत्या. पडद्यावर प्रेक्षकांना हसवणा-या या अवलियाने खासगी आयुष्यात मात्र खूप दुःख बघितले होते. त्यांचे त्यांच्या आईवर जीवापाड प्रेम होते. जेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले होते, तेव्हा ते घरात एकटे होते. त्यांनी नातेवाईकांना आईच्या निधनाबद्दल कळवल्यानंतर कुणाचाही त्यांच्यावर विश्वास बसला नव्हता. कादर खान थट्टा करत असल्याचे समजून सगळे त्यांच्यावर ओरडले होते. स्वतः कादर खान यांनी एका मुलाखतीत काही गोष्टी शेअर केल्या होत्या.
कादर खान यांनी सांगितले होते कारण...
- मुलाखतीत कादर खान म्हणाले होते, ज्या दिवशी माझ्या आईचे निधन झाले तो दिवस 1 एप्रिलचा होता. त्यामुळे मी जेव्हा नातेवाईकांना आईच्या निधनाची बातमी देत होतो, त्या सगळ्यांना मी त्यांची थट्टा करतोय, असेच वाटत होते. आईच्या निधनाची खोटी बातमी देऊ नकोस, असे सगळे मला म्हणाले होते.
आईवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना खांद्यावर उचलून घेऊन आले होते कादर खान...
- कादर खान यांनी एका मुलाखतीत आपल्या आईच्या निधनाबद्दल सांगितले होते. कादर खान एका स्पर्धेसाठी बाहेर गेले होते. घरी आल्यावर त्यांनी पाहिले तर आईला रक्ताच्या उलट्या होत होत्या. एका भांड्यात ती उलटी करुन ते सगळे रक्त बाथरुममध्ये ओतून देत होती. हे चित्र पाहून कादर खान प्रचंड घाबरले. त्यांनी आईला विचारले असता तिने थोडासा त्रास होत असल्याचे सांगितले. यावर कादर खान तू मला हे आधी का सांगितले नाहीस विचारत चिडले आणि डॉक्टरला आणण्यासाठी घराबाहेर पडले. पण डॉक्टर त्यांच्यासोबत येण्सास तयार होत नव्हता. यावेळी त्यांनी चित्रपटातील एखाद्या सीनप्रमाणे डॉक्टरला खांद्यावर उचलून घेतले आणि घरी आणले. घरी आल्यानतंर डॉक्टरने तपासलं तेव्हा त्यांचा आईचा मृत्यू झाला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.