आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा बिग बींवर भडकले होते कादर खान, सांगितले होते नाते खराब होण्याचे कारण, म्हणाले, 'त्या गोष्टीमुळे मला खूप दुःख झाले होते'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : कादर खान क्रिटिकल असल्याचे कळताच अमिताभ बच्चन यांनीं त्यांच्या सुखरूपतेसाठी प्रार्थना केली आहे. पण तुम्हाला माहित आहे का की एकदा बिग बी आणि कादर खान यानाचे नाते खराब झाले होते. कादर खान यांनी एका इंटरव्यूदरम्यान हे सांगितले होते. हि घटना हे अमिताभ बच्चन यांच्या 70 व्या बर्थडेच्या दिवसाची, जेव्हा कादर खान यांनी एका टीव्ही इंटरव्यूमध्ये पूर्ण माहिती सांगितली होती की कसे बिग बी आणि त्यांचे नाते खराब झाले होते. 

 

ऑक्टोबर 2012 मध्ये कादर खान यांनी इंटरव्यूमध्ये सांगितले, "अमिताभसोबत माझे एक नाते होते. जेव्हा ते एमपी बनून दिल्लीत गेले. तेव्हा मी खुश नव्हतो. कारण राजकारणातील जग असे आहे, जे माणसाला पूर्णपणे बदलवू परत पाठवते. मग वापस आले ते माझे अमिताभ बच्चन नव्हते.. मला त्यामुळे खूप दुःख झाले."

 

बिग बींनी दिली होती कादर खान यांना धमकी.. 
कादर खान यांनी त्या इंटरव्यूमध्ये पुढे सांगितले, "अमिताभ मला हेसुद्धा म्हणाले होते जर तुम्हाला राजकारणी घेऊन जात आहेत, घेऊन जाऊ इच्छितात...जर तुम्ही गेलात तर तुमच्याविरुद्ध पब्लिसिटी कारेन की हा माणूस चुकीचा आहे, याला मत देउनका, तुम्हाला हरवेन मी." कादर खान हेही टोमणा मारत म्हणाले, "मला तर हरवशील पण, तुम्ही कसे काय एमपी बनून आलात. एमपी बनल्यानंतर ते चेंज झाले होते" कादर खान यांनी हेसुद्धा सांगितले होते की, अमिताभ बच्चन यांच्यासोबत आता पूर्वीसारखे संबंध राहिलेले नाहीत. मात्र आजही ते त्यांना आपला चांगला मित्र समजतात. 

 

अमिताभसोबत घडलेल्या एका घटनेचेही उदाहरण दिले होते.. 
यावेळी कादर खान यांनी एका घटनेचे उदाहरण देत सांगितले होते की जेव्हा अमिताभ बच्चन खूप जास्त यशस्वी झाले होते आणि सुपरस्टार बनले होते, तेव्हा लोक त्यांना 'सर जी' म्हणून आदर देऊ लागले होते. पण माझ्यासाठी तर ते अमित किंवा अमिताभच होते. कादर खान यांनी पुढे सांगितले, "एकदा बिग बींच्या मित्रांची एक पार्टी होत होती, ज्यामध्ये मीसुद्धा होतो. तेव्हा अमिताभ यांना पाहून सर्व म्हणू लागले 'सर जी आ गए...' तर मी म्हणालो होतो की हे सर जी केव्हापासून झाले माझ्यासाठी तर हे अजूनही अमिताभच आहेत" कदर खान यांनी अमिताभ बच्चन यांच्यासाठी 'मुकद्दर का सिकंदर', 'नसीब' आणि 'अग्निपथ' अशा चित्रपटांचे डायलॉग्स लिहिले होते. 

 

अमिताभ बच्चन यांनी केलेल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे.. 
"कादर खान... प्रचंड प्रतिभा असलेले अभिनेते आणि लेखक. बीमार आहेत आणि हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांच्या सुखरूपतेसाठी आणि त्यांच्या तब्येतीत लवकर व्हाव्या म्हणून प्रार्थना करतो आहे. त्यांना मंचावर परफॉर्म करताना पहिले आहे, माझ्या चित्रपटांसाठी त्यांनी जबरदस्त रायटिंग केले आहे, माझे चांगले मित्र आहेत आणि कित्तेक जणांना माहित नाही,मला गणितही शिकवले आहे". 

T 3041 - KADER KHAN .. actor writer of immense talent .. lies ill in Hospital .. PRAYERS and DUAS for his well being and recovery .. saw him perform on stage, welcomed him and his prolific writing for my films .. great company, a Libran .. and many not know , taught Mathematics ! pic.twitter.com/yE9SSkcPUF

— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 28, 2018

बातम्या आणखी आहेत...