आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई. कादर खान आणि अनुपम खेर यांनी ''हसीना मान जाएगी' (Haseena Maan Jaayegi-1999), सूर्यवंशम' (Sooryavansham-1999) आणि 'दुल्हन हम ले जाएंगे' (Dulhan Hum Le Jayenge- 2000) सारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. पण जेव्हा 2016 मध्ये नरेंद्र मोदी सरकारने अनुपम खेर यांना पद्मश्रीने सन्मानित केले होते, तेव्हा कादर खान भडकले होते. त्यांचे हे वक्तव्य खुप व्हायरल झाले होते. कादर खान म्हणाले होते की, अनुपम खेर यांनी मोदींची चमचेगिरी केली.
अनुपम यांना पद्मश्री मिळाल्यानंतर कादर खान म्हणाले होते की, "ही चांगली गोष्ट आहे की, त्यांनी (मोदी)मला पद्मश्री दिला नाही. मी माझ्या आयुष्यात कधीच चमचेगिरी केली नाही आणि करणारही नाही. अनुपमने नरेंद्र मोदींचा उदोउदो करण्याशिवाय केलेच काय ? सरकारने त्यांना पद्मश्री दिला याचा मी विरोध करत नाही. पण मला जाणुन घ्यायचे आहे की, हा सन्मान मिळण्यायोग्य त्याने काम काय केले आहे? माझ्यात कुठे कमी राहिली."
अनुपम यांनी दिली कादर खान यांना श्रध्दांजली
- 81 वर्षांच्या कादर खान यांचे कनाडामध्ये निधन झाले आहे. यानंतर बॉलिवूड धक्क्यात आहे. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते म्हणाले की, कादर खान गेल्यामुळे ते खुप दुःखी आहेत. अनुपम म्हणाले की, ते कादर खान यांच्याकडून खुप काही शिकले आहेत. अनुपम यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कादर यांच्या कुटूंब आणि चाहत्यांसाठी संवेदना व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, "कादर साब तुमची खुप आठवण येईल."
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.