आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणीच्या लग्नासाठी जे पैसे साठवले, ते वडिलांच्या अंत्यसंस्कारात खर्च झाले, वरपक्षाची छोटीशी डिमांड पूर्ण करताना आले नाकी नऊ, मग 3 महिन्यांत कमावले 30 लाख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कपिल शर्माने एका एजन्सीशी बोलताना सांगितले आहे की, ते 12 डिसेंबर रोजी लग्न करणार आहेत. या चर्चेत त्याने आपला भाऊ आणि बहिणीच्या लग्नाचाही उल्लेख केला आहे. कपिल म्हणाला की, त्याने बहिणीचे लग्न थाटामाटात केले होते. परंतु, बहुतेकांना माहिती नाही की, बहिणीचे लग्न जेव्हा ठरले तेव्हा कपिल एवढा मजबूर होता की, त्याला आपल्या बहिणीसाठी अंगठीसुद्धा खरेदी करता आली नाही. याचा खुलासा खुद्द कपिलने एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या इंटरव्ह्यूतून केला होता. 

 

काय म्हणाला कपिल...
- कपिलनुसार, जानेवारी 2007 मध्ये जेव्हा त्याने बहीण (पूजा) चे लग्न ठरवले तेव्हा तिची (बहिणीची) सासू रिंग सेरेमनी करू इच्छित होती. परंतु कपिलकडे जी 6 लाख रुपयांची जमापूंजी होती, त्यातील 3.5 लाख रुपये तर वडिलांच्या अंत्यसंस्कारात आधीच खर्च झाले होते. उरलेले 2.5 लाख बहिणीच्या लग्नासाठी ठेवले होते. या पैशांतून अंगठी विकत घेता येत नव्हती.

 

मग मुंबईला पोहोचला अन् उजळले नशीब
- कपिल एप्रिल 2007 मध्ये मुंबईत आला अन् त्याचे नशीब उजळले. तो म्हणतो, "मी 'ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'चा विनर बनला आणि प्राइज मनीच्या रूपात मला 10 लाख रुपये मिळाले. त्याच रात्री मी बहिणीला कॉल केला आणि म्हणालो की, आपली रिंग खरेदी कर. नंतर मी शोज करणे सुरू केले आणि 30 लाख रुपये जमवले. ते बहिणीच्या लग्नासाठी पर्याप्त होते." म्हणजेच वरपक्षाची डिमांड ऐकून घाबरलेला कपिल शर्माने फक्त 3 महिन्यांत 30 लाख कमावलेले होते. एवढेच नाही, 2016 म्हणजेच 9 वर्षांनंतर कपिल शर्माने सोनी चॅनलशी जो करार केला होता, तो 110 कोटींचा होता. म्हणजेच कपिल तेव्हा दर महिन्याला 9 कोटी रुपयांहून जास्त कमावू लागला होता. तथापि, नंतर वादामुळे सोनीपासून कपिलला वेगळे व्हावे लागले. आता कपिल शर्मा पुन्हा एकदा लवकरच सोनीवर आपला शो घेऊन येणार आहे.

 

'लाफ्टर चॅलेंज'च्या ऑडिशनमध्ये रिजेक्ट झाला होता कपिल
- कपिल सांगतो, "मी कसेही करून लाफ्टर चॅलेंजचा भाग बनायचे होते. याच्या तिसऱ्या सीझनचे ऑडिशन अमृतसरमध्ये झाले होते, परंतु मी रिजेक्ट झालो. माझा शाळेतील मित्र राजू (चंदन प्रभाकर), जो 'कॉमेडी नाइट्स विद कपिल'मध्ये नोकराचा रोल करत होता, तो सिलेक्ट झाला. मीसुद्धा शोमध्ये सहभागी होण्याचा निश्यच केला होता. यासाठी दिल्लीच्या ऑडिशनमध्ये गेलो. मी सिलेक्ट तर झालोच, पण सीझनचा विनरही बनलो.

 

बातम्या आणखी आहेत...