Home | Maharashtra | Pune | when modi criticized on Pawar Family then its became a headline

आमच्यावर टीका केल्यास हेडलाइन होते त्यामुळे मी मोदींची आभारी - सुप्रिया सुळे

प्रतिनिधी | Update - Apr 14, 2019, 11:31 AM IST

राज ठाकरे करत असलेले काम महाराष्ट्रासाठी

  • when modi criticized on Pawar Family then its became a headline

    पुणे - नरेंद्र माेदी महाराष्ट्र दाैऱ्यावर आल्यावर सातत्याने पवार कुटुंबीयांना लक्ष्य करत आहेत. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय त्यांच्या बातमीची हेडलाइन हाेऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. आमच्यावर टीका करण्यास काहीच न उरल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आता टीका केली जात आहे. राज ठाकरे हे काेणत्याही फायद्या-ताेट्यासाठी काम करत नसून राज्याच्या प्रश्नावर काम करत आहेत. खडकवासला मतदारसंघात सभा घेण्याचा निर्णय राज ठाकरे यांचा असून त्यांना आम्ही काहीही सांगितले नसल्याचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. पंतप्रधान पवार कुटुंबावर टीका करत आहेत. कारण विकासाच्या मुद्द्यावर बाेलण्यासारखे त्यांच्याजवळ काही शिल्लक नाही. दुष्काळ व सुशिक्षित बेराेजगारीची माेठी समस्या सर्वत्र असताना त्यावर केंद्र आणि राज्य सरकार काही उपाययाेजना करत नाही. बारामतीला निवडणूक काळात बाहेरून येणाऱ्यांची संख्या माेठी असून ‘अतिथी देवाे भव’ वृत्तीप्रमाणे आम्ही सर्वांच्या स्वागतास तयार आहोत. मावळ लाेकसभा मतदारसंघात पार्थ अजित पवार याच्या प्रचारासाठी सभा घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

    ..म्हणून पवार वाचले
    महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हटले, यंदा एकही पवार लोकसभेत जाणार नाही. पवार राज्यसभेत आहेत त्यामुळे ते वाचले.

Trending