आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • When Opposition Raised Question Then Rajendra Prasad Returned His Jaguar Mark 7 Car

......आणि माजी राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी परत केली होती मार्क-7 जग्वार कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आजच्या काळात राजकीय नेत्यांचा स्वतःचे वेतन वाढवण्यावर विश्वास आहे. सोबतच महागड्या भेटवस्तू घेण्यासही ते टाळाटाळ करत नाहीत. इतकेच नाही तर स्वतःवर होणाऱ्या आरोपांना राजकीय खेळी सांगत त्यातून सुटका करून घेतात. पण भारतात असेही एक नेता होऊन गेले, ज्यांनी विरोधी पक्षाने केलेल्या एका आरोपामुळे स्वतःकष्टाने खरेदी केलेली कार देखील कंपनीला परत केली होती. आज देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांचा स्मृतीदिन आहे. त्यांच्या तत्वांमुळे ते आज लोकांच्या आठवणीत आहेत.


अवघे 2500 रूपये घेत होते पगार
> डॉ.राजेंद्र प्रसाद यांना त्यावेळी राष्ट्रपती पदासाठी 10 हजार पगार मिळत होता. पण डॉ.प्रसाद अर्धाच पगार घेत होते. त्यांचे म्हणणे होते की, अर्ध्या पगारात त्यांचा घरखर्च आरामात होतो. उर्वरीत अर्धी सॅलरी आपल्या खात्यामध्ये जमा करत होते. डॉ.प्रसाद यांच्या परिवाराचे म्हणणे आहे की, त्यांनी राष्ट्रपती पदाच्या नंतरच्या दिवसात पगाराच्या केवळ एक चतुर्थांश (2500 रुपये) रक्कम घेणे मंजूर केले होते. 

 

पुढे वाचा...विरोधी पक्षाने आरोपांनंतर परत केली होती कार

बातम्या आणखी आहेत...