आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कलम 370 चा उल्लेख करताच पंकजा मुंडेंच्या सभेत घोषणाबाजी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या रविवारच्या चिंचवड परिसरातील थेरगाव येथे आयोजित सभेत काही नागरिकांनी घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मुंडे यांच्या भाषणात स्थानिक समस्यांऐवजी कलम ३७० चा उल्लेख होताच आठ-दहा नागरिकांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली आणि मुंडे यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्वरित गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेतले. दरम्यान गोंधळ सुरू असतानाही पंकजा यांनी भाषण सुरूच ठेवले होते.

शहरातील अवैध बांधकामे, रिंग रोड, अतिक्रमण कारवाया या मुद्द्यांवरून गोंधळ घालण्याचा प्रयत्न काही जणांनी केल्याचे समजते. गोंधळ घालणाऱ्यांवर तुम्ही एका पक्षाचे दिसता असा आरोप पंकजा यांनी केल्यावर ते आणखीच चिडले. आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही, बाधित नागरिक आहोत, असे ते म्हणाले. त्यात काही महिलांचाही समावेश होता.