आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - प्रियंका चोप्राने ब्वॉयफ्रेंड निक जोन्ससोबत 18 ऑगस्ट रोजी साखरपुडा उरकला आहे. प्रियंकाच्या घरी आलेल्या भटजींनी पूजा-पाठसोबत दोघांची रोका सेरेमनी केली. प्रियंका आणि निकच्या साखरपुड्यात निकची आई डेनिस मिलर आणि वडील पॉल केविन जोनासही पोहोचले. तथापि, प्रियंका चोप्रा पती निक जोन्सपेक्ष जेथे 11 वर्षांनी मोठी आहे, तेथे ती आपल्या सासूबाई डेनिस मिलर जोन्सपेक्षा फक्त 16 वर्षांनीच लहान आहे. डेनिस सध्या 52 वर्षांच्या आहेत, तर प्रियंका 36 ची झालेली आहे. सासरे पॉल केव्हिनही प्रियंकापेक्षा 16 वर्षांनी मोठे आहेत.
मोठ्या दिरापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे प्रियंका, नणंद नाही...
निक जोन्स एकूण 4 भाऊ आहेत. केव्हिन जोनास (30 वर्षे) मोठा आहे. म्हणजेच प्रियंकाचा मोठा दीर तिच्यापेक्षा फक्त 6 वर्षांनी लहान आहे. यानंतर, जो जोनास (28 वर्षे), निक जोनास (25 वर्षे) आणि फ्रेंकी जोनास (17 वर्षे) आहेत. चारही भाऊ अमेरिकन सिंगर आणि अॅक्टर आहेत. केव्हिन जोनासचे लग्न झालेले आहे. त्याच्या पत्नीचे नाव डेनियल आहे. प्रियंकाच्या लग्नानंतर डेनियल तिची जाऊ होईल. तथापि, निकला एकही बहीण नाही.
जेव्हा प्रियंका मिस वर्ल्ड बनली, तेव्हा 8 वर्षांचा होता निक...
प्रियंका चोप्राने 2000 मध्ये जेव्हा मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता, तेव्हा तिचा होणारा पती अर्थात निक जोन्स फक्त 8 वर्षांचा होता आणि तो तिसऱ्या इयत्तेत शिकत होता. निकचा जन्म 16 सप्टेंबर 1992 रोजी झाला होता. प्रियंका आणि निकची पहिली भेट टीव्ही सिरीज 'क्वांटिको'च्या सेटवर एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. यानंतर 2017 मध्ये दोघे मेट गाला इव्हेंटमध्येही हातात हात घातलेले दिसले होते.
पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.