• Home
  • News
  • When Rajinikanth refused to act in the movie 'Tiranga' because of Rajkumar

बर्थ अॅनिव्हर्सरी / जेव्हा राजकुमार यांचे नाव ऐकताच रजनीकांतनी दिला होता 'तिरंगा' चित्रपटात काम करण्यास नकार


राजकुमार यांची अभिनय शैली, पांढरे बूट आणि त्यांचे संवाद आजही प्रेक्षकांना लो‍कप्रिय आहेत. 

दिव्य मराठी वेब टीम

Oct 08,2019 12:25:00 PM IST

गतकाळातील प्रसिद्ध अभिनेते राजकुमार यांचे खरे नाव कुलभूषण पंडीत होते. पोलिस सब इन्स्पेक्टरची नोकरी सोडून ते चित्रपट सृष्टीकडे वळले होते. 8 ऑक्टोबर 1926 रोजी बलुचिस्तान (पाकिस्तान) च्या लोरलाई येथे काश्मिरी पंडीतांच्या घरी त्यांचा जन्म झाला होता. वयाच्या 26 व्या वर्षी त्यांचा 'रंगीली' (1952) हा पहिला चित्रपट रिलीज झाला. त्यानंतर त्यांनी 'मदर इंडिया', 'हमराज' आणि 'हीर रांझा'सह सुमारे 70 चित्रपटांत काम केले होते. राजकुमार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे जवळचे मित्र आणि दिग्दर्शक मेहुल कुमार यांनी त्यांच्याविषयीचे काही किस्से सांगितले आहेत. मेहुल कुमार यांनी 'मरते दम तक', 'जंगबाज' आणि 'तिरंगा'सह अनेक गाजलेले चित्रपट दिग्दर्शित केले.

'तिरंगा' या चित्रपटात राजकुमार यांचा वेगळा होता अंदाज : मेहुल

  1. राजकुमार साहेबांविषयी सांगताना मेहुल कमार म्हणाले, आजवर लोकांना राजकुमार यांच्याविषयी ज्या गोष्टी ठाऊक आहेत, त्यापैकी ब-याच काल्पनिक आहेत. त्यांच्याविषयी सांगणारे लोक त्यांना ओळखतही नाहीत. मी त्यांच्यासोबत तीन चित्रपट केले. पण 'तिरंगा' या चित्रपटात त्यांचा वेगळाच जलवा होता. जेव्हा मी नाना पाटेकर आणि राज साहेबांना सोबत घेऊन 'तिरंगा' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली होती, तेव्हा इंडस्ट्रीतील 90% लोक मला म्हणाले होते की, मी ईस्ट आणि बेस्ट दोघांना साइन केले आहे.
  2. 'तिरंगा' या चित्रपटात नाना पाटेकर आणि राजकुमार साहेबांना एकत्र आणण्याची रंजक कथा आहे. राजकुमार यांचा शिस्तबद्ध स्वभाव बघता अनेक कलाकार त्यांच्यासोबत काम करण्यास तयार होत नसे. इन्स्पेक्टर शिवाजी राव वागळेच्या भूमिकेसाठी मी ज्या कलाकारांना विचारणा करायचो ते सगळे ही भूमिका करण्यास नकार देत होते.
  3. मी सर्वप्रथम नसिरुद्दीन शाह यांच्याकडे गेलो. ते मला म्हणाले - मेहुल भाऊ मला ही भूमिका करण्यास काहीच हरकत नाही. पण राज साहेबांसोबत मी काम करु शकत नाही. मग मी रजनीकांत यांना विचारणा केली. त्यांनी चित्रपटाची कथा ऐकून तुम्ही माझे खरे नाव व्यक्तिरेखेला दिले, असे म्हटले. पण एक अडचण आहे, मी राज साहेबांसोबत काम करु शकणार नाही. सेटवर काही टेंशन झाले, तर मग काय होईल. त्यामुळे तुम्ही मला माफ करा. असे म्हणून रजनीकांत यांनीही भूमिकेला नकार दिला. नानांना फोन केल्यानंतर मी कमर्शियल चित्रपट करत नसल्याचे कारण त्यांनी मला दिले.
  4. मी कसेबसे नानांना या भूमिकेसाठी तयार केले आणि राज साहेबांना फोन करुन वागळेच्या भूमिकेसाठी अभिनेत्याची निवड पूर्ण झाल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी 'भूमिका कोण करतोय?' असा प्रश्न मला केला. मी नाना पाटेकरांचे नाव सांगितले. त्यावर ते म्हणाले, 'अरे मेहुल! त्यांचे डोके कायम गरम असते. ते सेटवर शिवीगाळ करत असल्याचे मी ऐकून आहे.' मी राज साहेबांना म्हटले, मी आधीच सर्व गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. फक्त त्यावर नाना म्हणाले की, राज साहेब सेटवर इंटर फेअर करत असल्याचे मला आढळून आल्यास मी सेटवरुन निघून जाईल. राज साहेब केवळ एकच शब्द बोलले - 'मेहुल! गो अहेड.' त्यानंतर सहा महिन्यांत हा चित्रपट पूर्ण झाला आणि सुपरहिट ठरला.
  5. राज साहेबांविषयी आणखी एक किस्सा मेहुल यांनी सांगितला. राजकुमार त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये आर नंतर डबल ए लिहित असे. त्यांचा एक चित्रपट रिलीजच्या मार्गावर होता. चित्रपटाच्या बॅनरवर राजसाहेब त्यांच्या नावात डबल ए लावायला विसरले. त्यांनी दिग्दर्शकाला फोन करुन त्यांच्या खास शैलीत म्हटले, 'ज़ानी..., तुमको मालूम नहीं, हमारे नाम की स्पेलिंग में RAJKUMAR नहीं बल्कि RAAJKUMAR लिखा जाता है. अभी इसी समय बॅनर चेंज करो।'
X
COMMENT