आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानायक@76: बालपणापासून मित्र होते राजीव गांधी, तरीही खोटे बोलून अमिताभ बच्चन यांच्याकडून मागितला राजीनामा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. अमिताभ बच्चन 76 वर्षांचे झाले आहेत. 11 अक्टोबर 1942 ला इलाहाबाद, उत्तर प्रदेशमध्ये अमिताम बच्चन हे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधींचे खास मित्र होते. दोघं बालपणापासूनच मित्र होते. कारण त्या दोघांच्या आई तेजी बच्चन आणि इंदिरा गांधी यांची मैत्री होती. एकवेळी अशी आली होती जेव्हा राजीव गांधी यांनी खोले बोलून अमिताभ बच्चन यांच्याकडून लोकसभेचा राजीनामा मागितला होता. या गोष्टीचा खुलासा राशिद किदवई यांच्या 'नेता अभिनेता: बॉलीवुड स्टार पावर इन इंडियन पॉलिटिक्स'मध्ये करण्यात आला आहे. 

 

इंदिरा गांधी यांच्या एका निर्णयामुळे बिघडले होते नाते 
- ही गोष्ट 80 च्या दशकातील आहे. जेव्हा इंदिरा गांधी यांनी आपली जवळची मैत्रीण तेजी बच्चन ऐवजी अभिनेत्री नरगिसला राज्यसभेसाठी नॉमिनेट केले होते. तेव्हा इंदिरा गांधी आणि तेजी बच्चन यांच्या मैत्रीमध्ये फूट पडली होती. मेनका गांधी यांच्या पॉलिटिकल मॅगझीन 'सूर्या'मध्ये लिहिण्यात आले होते की, इंदिरा यांच्या निर्णयाने तेजी नाराज झाल्या होत्या. इंदिरा गांधी आणि तेजी यांच्यामध्ये या गोष्टींमुळे दिर्घकाळ दुरावा होता असा उल्लेख गांधी कुटूंबाचे जवळचे राहिलेले काँग्रेस नेता मोहन लाल फोतोदारच्या मेमॉयरमध्ये करण्यात आला आहे. 

 

हत्येच्या काही दिवसांपुर्वी इंदिराने राजीव यांना दिली होती ताकीद
- तेजी बच्चन आणि इंदिरा गांधी यांचे नाते खुप बिघडले होते. इंदिरा यांनी मुलगा राजीव गांधी(ते या काळात ऑल इंडिया क्राँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी होते) यांना अमिताभ बच्चनल यांना राजकारणात न आणण्याची ताकीद दिली होती. हत्येच्या काही दिवसांपुर्वी इंदिराने राजीव गांधी, अरुण नेहरु आणि मोहन लाल फोतोदार यांना बोलावून एक मीटिंग केली. यामध्ये मुलगा राजीव यांना भविष्यात दोन गोष्टी न करण्याचे सांगण्यात आले. यामधील एक म्हणजे त्यांनी अमिताभ बच्चन यांना राजकारणात आणायचे नाही. फोतेदार यांनी आपल्या मेमॉयरमध्ये लिहिले आहे की, जेव्हा 1984 मध्ये काँग्रेसने अमिताभ बच्चन यांना तिकीट दिले. फोतेदार यांनी राजीवला असे करण्यास नकार दिला होता पण त्यांनी मान्य केले नाही. इंदिरा यांना राजीव यांना दूसरा सल्ला होता की, ग्वालियरचे पूर्व महाराजा आणि काँग्रेस नेता माधव राव सिंधियापासून अंतर ठेवून राहावे. 

 

...आणि एक दिवस राजीवने अमिताभ यांना मागितला राजीनामा 
- फोतेदार यांच्यानुसार, 1985-87 पर्यंत सांसद सदस्याच्या रुपात अमिताभ बच्चन यांना खुप संघर्ष करावा लागला. त्यांच्यानुसार, मिनिस्ट्रीमध्ये ऑफिसर्सच्या ट्रान्सफर्स प्रकरणात अमिताभ यांनी दखल दिल्याचे त्यांना कळाले. पार्टीच्या अनेक नेत्यांनी या गोष्टीची तक्रार केली होती. जे लोक गंभीरपणे काम करत नव्हते. अशा लोकांना अमिताभ बच्चन यांनी निर्वाचन क्षेत्राचा चार्ज दिला होता. फोतेदार यांनी लिहिले होते की, त्यांनी अमिताभ यांच्या कार्य करण्याच्या पध्दतीविषयी राजीव गांधी यांना सांगितले नाही. अमिताभ बच्चन फक्त उत्तर प्रदेशच्या सरकारमध्येच दखल देत नव्हते तर मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्राच्या सरकारमध्येही दखल देत होते. 


- 1987 मध्ये एका दुपारी अमिताभ बच्चन हे पंतप्रधान राजीव गांधींना भेटण्यास आले. दोघांमध्ये काही तरी संवाद झाला. याच दरम्यान राजीव यांनी फोतेदार यांना बोलावले. तेव्हा राजीव अमिताभ यांना म्हणाले की, 'फोतेदारांची इच्छा आहे की, तुम्ही राजीनामा द्यावा.' यानंतर अमिताभ यांनी उत्तर दिले, "जर फोतेदारजी यांना राजीनामा हवा असेल तर मी तयार आहे. पेपर द्या." राजीव यांनी रायटिंग पॅड दिला आहे म्हणाले, "हँड रायटिंगमध्ये स्पीकर यांना लिहा की, तुम्ही लोक सभेचा राजीनामा देत आहात." अमिताभ यांनी असेच केले आणि त्यांचा राजीनामा स्विकारण्यात आला. फोतेदार यांनी सांगितल्यानुसार, अमिताभ यांच्या राजीनाम्याविषयी फोतेदार आणि राजीव गांधी यांचे काहीच डिस्कशन झाले नव्हते हेच सत्य आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...