आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन रेखाला या अॅक्टरने बळजबरीने केले होते Kiss, सेक्शुअल हरॅसमेंटपेक्षा कमी नव्हता तो क्षण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेका नाना पाटेकरवर गैरवर्तन केल्याचा आरोप लावला आहे. 2008 मध्ये 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर नानांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे तनुश्रीने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले. बॉलिवूड चित्रपटांच्या सेटवर अशापद्धतीची घडलेली ही काही पहिली घटना नाही. बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखासोबत 49 वर्षांपूर्वी शूटिंगदरम्यान असेच काहीसे घडले होते. रेखाची ऑटोबायोग्राफी 'रेखा : द अनटोल्ड स्टोरी'मध्ये यासेर उस्मान यांनी या घटनेचा उल्लेख केला आहे.


वयाच्या 15 व्या वर्षी रेखाने दिला होता करिअरचा पहिला किस सीन... 
- ही गोष्ट 1969 च्या 'अनजाना सफर' चित्रपटाच्या सेटवरची आहे. मेहबूब स्टूडियो, मुंबईमध्ये राजा नवाथे यांच्या दिग्दर्शनात चित्रपटाचे शुटिंग सुरू होते. पहिल्या शेड्युल्डमध्ये कुलजित पाल, राजा आणि विश्वजीत यांनी रेखासाठी एक प्लॅन तयार केला. त्यादिवशी रेखा आणि विश्वजीत यांच्यात एक रोमँटिक सीन शूट होणार होता. दिग्दर्शक राजा नवाथेंनी अॅक्शन म्हणताच विश्वजीत यांनी 15 वर्षीय रेखाला आपल्या मिठीत घेतले आणि तिचे चुंबन घ्यायला सुरुवात केली. रेखाचा करिअरमधील हा पहिला किसींग सीन असल्याच उल्लेख तिच्या ऑटोबायोग्राफीत आहे. 


दिग्दर्शकाने कट म्हटले नाही... 
- विश्वजीत यांनी चुंबन घ्यायला सुरुवात केल्यानंतर रेखा आवाक् झाली होती. कारण तिला याबाबत पुर्वकल्पना देण्यात आली नव्हती. पाच मिनिटे विश्वजीत रेखाला किस करत राहिले. रेखाच्या मर्जीविना हे सर्व सुरु असताना दिग्दर्शकाने कट म्हटले नाही आणि विश्वजीत तिला Kiss करत राहिले. विश्वजित रेखाला किस करत होते तेव्हा त्याठिकाणी असलेले युनिट मेंबर्स शिट्या वाजवत चीअर करत होते. रेखा यांचे डोळे बंद होते पण त्यांचे अश्रू स्पष्ट दिसत होते.

 

विश्वजीत यांनी दिले होते स्पष्टीकरण... 

विश्वजीत यांनी त्यांच्या या Kiss सीन वर स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, यात त्यांची काहीही चूक नाही. त्यांनी दिग्दर्शक राजा नवाथे यांच्या सांगण्यावरुन तसे केले होते. ती त्या सीनची गरज होती. यानंतर रेखा आणि विश्वजित यांचे नाव जोडले जाऊ लागले होते.

 

बातम्या आणखी आहेत...