आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • When Saif Ali Khan Became Father First Time, Kareena Kapoor Was About 13 Years Old

सैफ पहिल्यांदा 'बाबा' झाला, तेव्हा अवघ्या 13 वर्षांची होती करीना कपूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: सैफ अली खानची मुलगी सारा अली खान 25 वर्षांची झाली आहे. 12 ऑगस्ट 1993 मध्ये मुंबईत तिचा जन्म झाला. सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंहची ती मुलगी आहे. तिचा जन्म झाला तेव्हा सैफ 23 वर्षांचा आणि अमृता 35 वर्षांची होती. परंतू त्यावेळी सैफची दुसरी पत्नी अवघ्या 13 वर्षांची होती, हे तुम्हाला माहिती आहे का? 


- सैफ आणि अमृताचे लग्न 1991 मध्ये झाले होते. त्यावेळी करीना जवळपास 11 वर्षांची होती. तीसुध्दा या लग्नात गेली होती. तेव्हा करीना सैफला लग्नाच्या शुभेच्छा देत म्हणाली होती की, "शादी मुबारक हो सैफ अंकल' आणि सैफ हसतच तिला "थँक यू बेटा" असा म्हणाला होता. करीना याच्या 21 वर्षांनंतर सैफची दूसरी बायको बनली. 
- साराच्या जन्माच्या जवळपास 8 वर्षानंतर सैफ आणि अमृताचा मुलगा इब्राहिमचा जन्म झाला. याच्या तीन वर्षानंतर 2004 मध्ये सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाला. सैफने 2012 मध्ये करीना कपूरसोबत लग्न केले. आता करीना आणि सैफला तैमूर हा मुलगा आहे. 


पहिल्या बायकोचे मुलं काय करतात
सैफची मुलगी साराने 2016 मध्ये गॅज्यूएशन केले आहे. सध्या ती बॉलिवूडमध्ये एंट्री घेण्याच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. 'केदारनाथ' हा तिचा डेब्यू चित्रपट होता. हा चित्रपट 30 नोव्हेंबरला रिलीज होऊ शकतो. चित्रपटांमध्ये एंट्री घेण्यापुर्वी सारा ग्लॅमर जगताशी जोडली आहे. जानेवारी 2012 मध्ये तिने फॅशन मॅगझीन 'हॅलो'साठी एक फोटोशूट केले होते. यामध्ये तिची आई अमृता सिंहसोबत दिसत होती. साराने ऑगस्ट 2012 मध्ये रॅम्पवर डेब्यू केला होता. मुकेश अंबानी आणि नीता अंबानीच्या पार्टीमध्ये हा वॉक केला होता. अबू जानी-संदीप खोसला यांनी फॅशन वर्ल्डमध्ये 25 वर्षे पुर्ण केल्याच्या निमित्ताने ही पार्टी ठेवण्यात आली होती. सारा डबू आणि संदीप यांनी डिझाइन केलेल्या आउटफिटमध्ये रॅम्पवर उतरली होती. 
- सैफचा मुलगा इब्राहम आता 17 वर्षांचा आहे आणि आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करतोय. इब्राहिमने यशराज प्रोडक्शनच्या 'टशन' चित्रपटात सैफच्या बालपणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे डायरेक्शन विजय कृष्ण आचार्यने केले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...