आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेटवर भेटायला आलेल्या चाहतीच्या बघताच क्षणी प्रेमात पडला होता हा अॅक्टर, तीन वर्षे सुरु होते अफेअर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/चेन्नईः दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता जोसेफ विजयचा 'सरकार' हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री वरलक्ष्मी आणिर कीर्ती सुरेश झळकणार आहेत. पडद्यावर विजयने अनेक अभिनेत्रींसोबत रोमान्स केला आहे, पण खासगी आयुष्यात त्याने त्याच्या एका चाहतीसोबत संसार थाटला आहे. विजयच्या या चाहतीचे आणि आता पत्नी असलेल्या तरुणीचे नाव संगीता सूर्णलिंगम असून ती विजयच्या अभिनयाची फॅन होती. याच कारणामुळे ती एकदा त्याला भेटायला चित्रपटाच्या सेटवर गेली होती. नंतर विजयने याच तरुणीसोबत लग्न थाटून तिला आयुष्याचा जोडीदार बनवले.

 

विजयच्या चित्रपटाचे शूटिंग बघण्यासाठी लंडनहून चेन्नईत पोहोचली होती संगीता... 
झाले असे की, 1996 मध्ये विजयचा 'पूवे उनक्कगा' हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्याच्या अभिनयाचे बरेच कौतुक झाले होते. चित्रपट आणि त्याच्या अभिनयाचे प्रेक्षकांसोबतच समीक्षकांनीही तोंडभरून कौतूक केले होते. संगीता त्याकाळा यूके (यूनाइटेड किंगडम) मध्ये वास्तव्याला होती आणि ती विजयची मोठी चाहती होती. संगीता श्रीलंकेत राहणा-या एका तामिळ उद्योगपतीची मुलगी आहे, ती नंतर यूकेत शिफ्ट झाली होती. विजयच्या पुढच्या चित्रपटाचा सेट चेन्नईतील फिल्मसिटीत सेट लागला होता. शूटिंगपासून ब्रेक घेऊन विजय सेटवर थांबला होता आणि तेव्हा एक सुंदर तरुणी त्याला भेटायला आली आणि स्वतःचे नाव संगीता सूर्णलिंगम सांगून स्वतःची ओळख करुन दिली. त्यावेळी विजय आणि संगीत यांच्यात थोडेच बोलणे झाले. पण पहिल्याच भेटीत विजयला संगीता आवडली होती.

 
विजय किंवा संगीता यांच्यापैकी कुणीच दिली नाही प्रेमाची कबुली... 
या भेटीनंतर विजयने संगीतासोबत दोनदा फोनवर बोलणे केलेआणि मग हळूहळू दोघांचा लपून छपून भेटीचा क्रम सुरु झाला. संगीता अनेकदा त्याला भेटायला चेन्नईत येत असे. विजयचे संगीतावर प्रेम जडले होते. पण तरीदेखील त्याने संगीताकडे आपल्या प्रेमाची कबुली दिली नाही आणि संगीतानेही पुढाकार घेतला नाही.

 

विजयने संगीताची आईवडिलांशी घालून दिली भेट...
सुमारे वर्षभरानंतर विजयने संगीताला त्याच्या घरी आमंत्रित केले. विजयचे आईवडील संगीताला भेटले आणि याच मुलीला विजय कायम भेटत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. विजयच्या वडिलांनी संगीताला माझ्या मुलाशी लग्न करशील का? असा प्रश्न विचारला, त्यावर संगीताने लगेच होकार दिला. संगीताच्या होकारानंतर विजयच्या आईवडिलांनी लंडनमध्ये जाऊन संगीताच्या पालकांची भेट घेण्याचे ठरवले. संगीताचे आईवडीलही विजयला जावई करुन घेण्यास तयार झाले.

 

25 ऑगस्ट 1999 रोजी हिंदू पद्धतीने झाले लग्न...
25 ऑगस्ट 1999 रोजी विजय आणि संगीताचे लग्न झाले. विजय ख्रिश्चन तर संगीता हिंदू कुटुंबातील आहे. विजयने संगीतासोबत हिंदू पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर चेन्नईत एक ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टी देण्यात आली होती.

 

2000 मध्ये पहिल्यांदा बाबा झाला विजय...
 2000 मध्ये विजय आणि संगीता पहिल्यांदा आईबाबा झाले. विजयच्या घरी मुलाचा जन्म झाला. या कपलने आपल्या मुलाचे नाव जैसन संजय ठेवले. 2005 मध्ये त्यांची मुलगी दिव्या साशाचा जन्म झाला. साशा आणि जैसन यांनी विजयच्या काही चित्रपटांमध्ये कॅमिओ केले आहे. जैसनने 2009 मध्ये आलेल्या 'वेत्तइकारन'मध्ये कॅमिओ केला तर साशानेही काही चित्रपटांत छोटेखानी भूमिका वठवल्या. 

 

या चित्रपटांमध्ये झळकला आहे विजय...
विजयने करिअरची सुरुवात  1984 मध्ये आलेल्या 'वेत्री' या चित्रपटाद्वारे केली. या चित्रपटात तो बालकलाकाराच्या रुपात झळकला होता. त्याचा हीरो म्हणून आलेला पहिला चित्रपट 'नालय्या थीरपू' असून तो 1992 साली रिलीज झाला होता. त्यानंतर विजयने सेंधूरपंदी (1993), रसिगन (1994), देवा (1995), चंद्रलेखा (1995), सेल्वा (1996), नेरुक्कू नेर (1997), प्रियमुदन (1998), फ्रेंड्स (2001), थमिजन (2002), थिरुपाची (2005), पोक्किरी (2007), विल्लू (2009), कावलन (2011), थुपक्की (2012), कथ्थी (2014), थेरी (2016) या चित्रपटांमध्ये काम केले. 

बातम्या आणखी आहेत...