आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध संबंधांना विरोध केला म्हणून पतीने पत्नीला साखळदंडाने बांधले, वर्षभर बंदी बनवुन केली मारहाण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कांकेर(छत्तीसगड)- चारामातील कसावाही गावात शुक्रवारी रात्री पोलिसांनी एका महिलेला पती डोमर पटेलच्या कैदेतून सोडवले. डोमरने तिला मागील वर्षभरापासून साखळ दंडाने बांधून कैद केले होते. महिलेची चुक इतकीच होती की, तिने पतीच्या अवैध संबंधांना विरोध केला.

 
डोमरने तिला बंदी तर बनवलेच होते, शिवाय रोज तिला रॉडने मारहाण करत होता. भुक लागल्यावर तिला वाळलेली पोळी द्यायचा आणि मुलांनी जेवण दिल्यावर त्यांनाही मारायचा. डोमर आणि महिलेचे लग्न 10 वर्षांपूर्वी झाले होते आणि त्यांना 2 मुले आहेत. सुचना मिळाल्यावर महिला मानव अधिकार रक्षक टीमने शुक्रवारी महिलेची सुटका केली.

 

कुटुंबीय म्हणाले- घरगुती वाद
महिलेला वडील नाहीयेत. काही नातेवाईकांना याची माहिती लागल्यावर त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला नाही. पत्नी याची तक्रार करू शकली नाही म्हणून तिला नदिकिनारी असलेल्या घरात बंदी बनवले. तिला भुक लागल्यावर वाळलेली पोळी द्यायचा.

मुलांनी जेवण दिल्यावर त्यांनाही मारायचा
मुलांनी कधी आईला जेवण दिले आणि याची माहिती आरोपीला लागल्यावर तो मुलांनाही मारायचा. माहिती मिळाल्यावर महिला मानव अधिकार रक्षक टीमने महिलेची सुटका केली.