आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेट्रोल संपले तरी बॅटरीवर 75 किमी धावेल दुचाकी; नागपुरच्या अभिजित खडखडी व शुभम कनिरेने बनवले 'पेट्रो हायब्रीड व्हेइकल' उपकरण 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- पेट्रोलचे भाव सध्या नियंत्रित आहेत, पण ते वाढले तरी किंवा तुमच्या दुचाकीतील पेट्रोल रस्त्यातच संपले तरी खूप चिंता करण्याचे कारण नाही. कारण पेट्रो हायब्रीड व्हेइकल' या बॅटरीसारख्या उपकरणावर तुमची गाडी पेट्रोल संपल्यानंतरही किमान ७५ किलोमीटर धावेल. एक दुचाकी साधारणत: ६० ते ६५ किमी अॅव्हरेज देते. पेट्रो हायब्रीड व्हेइकल' उपकरण लावल्यानंतर ती आणखी ७५ किमी चालेल. म्हणजे एकूण १३५ किमीपर्यंत धावू शकेल. पेट्रोल आणि बॅटरी अशा दोन्ही इंजिनांवर चालणारे हे उपकरण अभिजित खडखडी व शुभम कनिरे या दोन मित्रांनी तयार केले. त्याचे पेटंटही या त्यांनी घेतले आहे. अनुप बोबडे व आशिष धामणकर या दोन मित्रांनी अभिजित व शुभमला तांत्रिक व आर्थिक मदत केली. ५ जानेवारीपासून महिनाभर त्यांनी दुचाकीला हे उपकरण लावून चाचणी घेतली. महिनाभराच्या चाचणीत आढळून आलेल्या त्रुटी दूर करून आता सुधारित व निर्दोष उपकरण तयार आहे. स्टार्ट अप इंडिया' अभियानांतर्गत १० लाखांचे मुद्रा लोन पंजाब नॅशनल बँकेकडून मिळाले. येत्या २ महिन्यांत स्वत:चे उत्पादन सुरू करणार असल्याचे शुभम कनिरे याने सांगितले. शुभम कनिरे मेकॅनिकल इंजिनिअर आहे. तर अभिजित, अनुप व आशिष हे तिघेही बी एस्सी. आहेत. 

 

असे करते हे तंत्रज्ञान काम 
दुचाकीच्या मागील टायरवर पेट्रोल इंजिनला लागून असलेल्या चेनमध्ये पेट्रोल हायब्रीड व्हेईकल उपकरण लावले येते. त्यातील कसॉईल रनिंग मोटर मिनिटात ३ हजार वेळा फिरते. यासाठी ४८ व्होल्टची बॅटरी व दोन लिथीयम आयर्न बॅटऱ्या दुचाकीस जोडल्या जातात. दुचाकी धावत असतानाच तीनही बॅटऱ्या चार्ज होत राहातात. पेट्रोल संपल्यावर इंजिन सुरू करण्याची गरज नसते. चावीने इग्नेशन दिले की की चार्जींगवरच दुचाकी धावते. यात किमान ५० टक्के पेट्रोलची बचत होत असल्याचा दावा, खडखडीने केला. 

 

पेट्रो हायब्रीड व्हेइकल उपकरण चाचणीत आढळलेल्या त्रुटी केल्या दुरुस्त 
चाचणीत पेट्रो हायब्रीड व्हेइकल' हे बॅटरीसारखे उपकरण दुचाकीतील बॅटरीला न जोडता थेट वायरिंग करून जोडण्यात आले. त्यामुळे पिकअप मिळत नव्हता. तसेच उपकरणाच्या वेगाने फिरण्यामुळे मोटर चेन ससॉकेट तुटत होते. कंट्रोलिंग किट व नवे अॅक्सलरेटर लावून घेतलेल्या चाचणीत दुचाकी व्यवस्थित धावली. 
 

बातम्या आणखी आहेत...