आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली : काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी-वढेरा यांना उत्तर प्रदेशात जाऊन सीएए आंदाेलनादरम्यान जखमी झालेल्यांना जाऊन भेटायला वेळ मिळताे. त्यांनी अनेकवेळा अशी भेट दिली. त्या विशिष्ट लाेकांबद्दल सहवेदना दाखवतात. परंतु, त्या राजस्थानमधील १०० बालकांच्या मृत्यूनंतरही काे.टात त्यांच्या नातेवाइकांच्या भेटीला का गेल्या नाहीत? त्या पीडितांची कधी भेट घेणार आहेत? असा प्रश्न भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी उपस्थित केला आहे. नागरिकत्व कायद्याच्या विराेधातील आंदाेलनात पाेलिस कारवाईचा बळी ठरलेल्यांना शहीद असे प्रियंकांनी संबाेधले आहे. काँग्रेसने लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्याबद्दल अनुदगार काढले हाेते. अशा हिंसक गाेष्टीत सामील असणाऱ्यांना शहीद म्हणायचे. हीच काँग्रेसची शहिदांबद्दलची व्याख्या आहे का? असा प्रश्न पात्रा यांनी उपस्थित केला.
काेटा रुग्णालयात शंभरावर बालकांनी प्राण गमावले. मी त्यांना काेटा चॅलेंज देताे. त्या काेटाला कधी जाणार आहेत? राजस्थानात काँग्रेसचे सरकार आहे. त्यांच्या सरकारच्या कार्यकाळात निष्पाप मुलांचे बळी जात आहेत. त्या स्वत: एक माता आहेत. त्यांना इतर मातांच्याही वेदना समजतात. परंतु, त्यांनी एआयआयएमएसच्या ट्राॅमा सेंटरला वारंवार भेट देणे सुरू ठेवले आहे. त्या जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस करू लागल्या आहेत. त्यावरून विशिष्टांच्या सहवेदना त्यांना लक्षात येत आहेत. काेटा येथील दु:ख त्यांना दिसत नाही, असा टाेला पात्रा यांनी लगावला.
काँग्रेसच्या राजकारणाला दीदीही कंटाळल्या
सीएए, एनआरसीच्या मुद्यावर १३ जानेवारी राेजी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विराेधी पक्षांची बैठक आयाेजित करण्यात आली आहे. परंतु, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बैठकीला जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यावरून काँग्रेसच्या राजकारणाला त्याही कंटाळल्या आहेत, हे दिसून येते. खरे तर विराेधी पक्ष आता परस्परांचे वाभाडे काढू लागले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्यात चढाआेढ लागली आहे. एखाद्या मुद्यावर ध्रुवीकरण करण्यासाठी सर्वच विराेधी पक्षांत परस्परांत स्पर्धा लागली आहे. पश्चिम बंगालमधील मुस्लिम मते दुसऱ्या काेणत्याही पक्षाला मिळू नयेत, असे ममतांना वाटते. त्यामुळे त्या बैठक टाळू लागल्या आहेत, असे पात्रा यांनी सांगितले.
प्रियंका गांधी यांनी वाराणसीत सीएएविराेधी कार्यकर्त्यांची घेतली भेट
नवा नागरिकत्व कायदा हा संविधानाचे उल्लंघन करणारे पाऊल आहे. त्याच्या विराेधात शांततेने आंदाेलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मी आभार व्यक्त करते, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. शुक्रवारी त्यांनी वाराणसीत सीएएविराेधी कार्यकर्ते दांपत्य एकता शेखर सिंह व रवी शेखर यांची भेट घेतली. या दाेन्ही कार्यकर्त्यांना अटक झाली हाेती. एकता यांची लहान मुलगी त्यांची वाट पाहत हाेती. त्यांनी मला सर्व हकिगत सांगितली. त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. तेथे त्यांना १५ दिवस ठेवण्यात आले. त्यांच्याविराेधात अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु, मला त्यांचा अभिमान वाटताे. सरकारचे वागणे मात्र संविधानाला धरून नाही, असे प्रियंका यांनी पत्रकारांना सांगितले. प्रियंका यांचा हा चार तासांचा वाराणसी दाैरा हाेता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.