आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • When Will Shahrukh Khan's Daughter Suhana Enters In Bollywood, Best Ananya Pande Reveals About That

शाहरुख खानची मुलगी सुहाना केव्हा करणार बॉलिवूडमध्ये एंट्री, खास मैत्रीण अनन्याने केला याबाबत खुलासा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान नेहमीच आपल्या फोटोमुळे आणि व्हिडीओजमुळे चर्चेत असते. सुहाना खान सध्या चित्रपटांपासून दूर आहे. पण तिचे ग्रॅजुएशन झाल्यापासून सुहाना खानचे फॅन्स आता तिच्या बॉलिवूड डेब्यूची वाट पाहात आहेत. अशातच सुहाना खानची 'बेस्टी' आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने सुहाना खानच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल एका इंटरव्यूमध्ये खुलासा केला. 

 

अनन्या म्हणाली, सुहाना खूप टॅलेंटेड आहे...  
अनन्या पांडेने सुहाना खानच्या बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याबद्दल सांगितले, ‘तिची जेव्हा इच्छा असेल तेव्हा ती करेल. सध्या तर ती फिल्म स्कूलला जात आहे, ती शिक्षणासाठी न्यूयॉर्कला जात आहे. तर मला वाटते की, तिला आपले शिक्षण पूर्ण करायचे आहे. त्यांनतर तिला जेव्हा वाटेल तेव्हा ती परत येईल आणि अभिनय करेल. ती खूपखूप टॅलेंटेड आहे आणि मला तिला मोठ्या पडद्यावर पाहण्याची खूप उत्सुकता आहे.’
 

बातम्या आणखी आहेत...