आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू झाल्यानंतर माणसाला तो मेल्याचे कळत असल्याचा शास्त्रज्ञांनी केला दावा, मृत्यूपश्चात जाणवतात जवळपासच्या घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युरोप - जगातील शाश्वत सत्य म्हणजे मृत्यू आणि त्यानंतर काय होते हे अजूनही एक न उलगडलेले कोडे. पण शास्त्रज्ञ मात्र मृत्यूनंतर होणाऱ्या घटनांची माहिती गोळा करण्याचे काम करत आहे. अलीकडच्या अहवालात असा दावा करण्यात आला की, एखादी व्यक्ती मरण पावला तर मरण पावल्यानंतर त्या व्यक्तीला तिचा मृत्यू झाल्याचे समजते. शास्त्रज्ञांनी यामागे मेंदूच्या कार्यप्रणालीचे कारण सांगितले आहे. 

 

मृतदेहात असते चेतना

>  लाइव्ह सायन्सच्या अहवालानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यानंतर काही काळासाठी तिचा मेंदू कार्यरत असतो. म्हणजे शरीरातील प्राण निघून गेल्यानंतरही शरीरातील संवेदना जागृत असते. या संवेदनांमुळेच व्यक्तीला समजते की, तिचा मृत्यू झाला आहे. व्यक्ती हॉस्पिटलमध्ये असेल तर डॉक्टरांद्वारे तिला मृत घोषित करताना ती ऐकू शकते. मृत्यूपश्चात मेंदूचे कार्य करणे म्हणजे संपूर्ण कार्य नाही तर ती फक्त जागृत चेतना असते. 
 

ह्रदयाचे ठोके थांबल्यावरही जागृत असते चेतना 
> अहवालात दावा करण्यात आला आहे की, ह्रदयाचे ठोके थांबल्यावर शरीराच्या बाकीच्या अवयवयांचे कार्य बंद पडते. पण मेंदूमध्ये चेतना जागृत असते. याचा अर्थ मृत व्यक्ती काही काळासाठी मेंदूमध्ये कैद असतो. पण हा कालावधी फार कमी असतो. 


हार्ट अॅटॅकचे पेशंट आहेत याचा पुरावा
> अहवालात सांगितले आहे की, मरणानंतर पुन्हा जिवंत होणारे लोक या गोष्टीचा पुरावा आहेत. यामध्ये हार्ट अॅटॅक पेशंटचे प्रमाण जास्त आहे. डॉक्टरांनी सांगितले की, पहिले अशा लोकांना मृत घोषित केले होते. त्यांचे ह्रदय बंद पडले होते. डॉक्टरांनी प्रयत्न करून त्यांना वाचवले. तर काही आपोआप जिवंत झाले होते. जिवंत झाल्यावर त्यांच्या सभोवतालच्या डॉक्टरांनी केलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात होत्या. म्हणजेच त्यांच्यातील चेतना जागृत होती. 

बातम्या आणखी आहेत...