आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही गुंतवणूक कुठं करता? वस्तूंमध्ये की नात्यामध्ये?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर संख्या पाहिली तर कोणत्याही समृद्ध व्यक्तीच्या घरी तीन लाख गोष्टी असतात. हे कळल्यावर तुम्ही लगेच आजूबाजूला वस्तू बघणार किंवा त्या मोजायला सुरू करणार. पुढे जाऊन जेव्हा तुम्ही कॉलमच्या शेवटी वाचाल तेव्हा मी पैज लावून सांगतो की आयुष्यभर तुम्ही तुमच्या घरी वस्तू कधीच मोजल्या नसतील. वस्तूंच्या बाबतीत तुम्ही कधीच दुबईचे रहिवासी गजानन शेलवणकर यांना मागे नाही टाकू शकत. यांनी स्वत:जवळ फक्त जीवनावश्यक वस्तूंचा साठा केला आहे. जरा जागेवर स्थिर बसा आणि जाणून घ्या की गजानन यांच्याकडे संपूर्ण घरात फक्त ४१ वस्तू आहेत. ते दुबईमध्ये आपल्या घरात एका अपार्टमेंटच्या खोलीत जमिनीवर झोपतात आणि पायात चप्पल न घालता चालतात. पण त्यांच्यासाठी कमीत कमी सामानाचा वापर म्हणजे जीवनात कमीत कमी तणावात जगणे. त्यांच्या या साध्या विचाराचा अर्थ हा वस्तूंमध्ये अडकून न राहणे आणि मोकळीक मिळवणे हा आहे. तुम्ही याला काहीही नाव देऊ शकता, पण ही गोष्ट नाकारू शकत नाही की किमान वस्तूंमध्ये आपली जीवनशैली ही जगता येऊ शकते. गजाननसारखे अनेक लोक आहेत, ज्यांची पहिली पसंती ही न्यूनतावाद आहे. गजाननची ही जीवनशैली अनेक मित्रांपर्यंत पोहोचली आहे. आता हे लोक अशा वस्तूंपासून दूर राहणे पसंत करतात, ज्या वस्तूंमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. आता हे केवळ अशा वस्तूंचा वापर करतात ज्यामुळे त्यांना आनंद मिळतो. न्यूनतावाद एक अमूर्त अभिव्यक्ती म्हणून याची सुरुवात झाली असेल, परंतु आता तो बऱ्याच लोकांच्या जीवनाचा मार्ग बनला आहे. हा विषय बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचत आहे. यूएईमध्ये जन्मलेला आणि तेथेच वाढलेला हा ३५ वर्षीय तरुण एकेकाळी अनेक क्रेडिट कार्ड आणि कर्जावर अवलंबून होता. त्याने पदवीनंतर २००७ मध्ये काम सुरू केले. त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे  होते. भारतीय वंशाच्या या व्यक्तीने म्हटले आहे, ‘होय, मी खरोखर वेड्यांसारख्या ब‍ऱ्याच गोष्टी केल्या आहेत. त्याच्याकडे बऱ्याच गोष्टी उपलब्ध होत्या. बरेच फोन,  छोटी गॅजेट्स, एकाच वेळी तीन लॅपटॉप, एक डेस्कटॉप आणि तीन मोबाइल होते. दुबईतील मॉलमध्ये खरेदी करणे हा त्याचा आवडता टाइमपास होता. पण २०११ मध्ये त्याच्यावर जवळपास १० लाख दिऱ्हम (सुमारे दोन कोटी रुपये) चे कर्ज झाल्याचेे समोर आले. त्याला कुटुंबीयांपेक्षा अधिक बँकंामधून फोन येऊ लागले. तो चक्रवाढ व्याज आणि व्याज याच्या चक्रव्यूहामध्ये अडकत गेला. क्रेडिट कार्डचा व्याजदर हा बँकेच्या व्याजदरापेक्षा जास्त असतो. बँकेचे कर्ज चुकविण्यासाठी त्याने आपले खर्च कमी केले. गजाननने त्या वेळी आपल्या मनात पक्क केलं. आता भारतात क्रेडिट कार्डचा वापर खूप वाढला आहे. २०१८ मधील ७८,४९९ कोटींच्या तुलनेत २०१९ मध्ये ही वाढ होऊन ९७५५० कोटी झाली आहे आणि पैसे न भरलेल्या क्रेडिट कार्डधारकांची संख्या २४ टक्क्यांनी वाढली आहे. तुम्हाला हे आवडेल किंवा नाही आवडेल, तरीही लवकरच कमीत कमी वस्तूंचा वापर जीवनशैली ही एक फॅशन बनेल. अशा प्रकारे न्यूनतावादाचा मुख्य सिद्धांत हा कमीत कमीमध्ये अधिक उपयोग यावर आधारित आहे. म्हणेज कोणत्याही वस्तू साठवणुकीची आवड व तणावरहित आयुष्य जगण्याचा हा मूलमंत्र आहे.  फंडा असा : जर आपण आपल्या आयुष्यात वस्तूंना घालवून नात्यांवर वर आपलं लक्ष ठेवलं तर आपलं जीवन तणावमुक्त होऊ शकेल. 

बातम्या आणखी आहेत...