आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वर्गाचा मार्ग कुठून जातो?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडोनेशियाच्या बाली बेटावर असलेल्या लेम्प्युयांग मंदिराचा दरवाजा “स्वर्गाचा दरवाजा’म्हणून जगविख्यात आहे. - Divya Marathi
इंडोनेशियाच्या बाली बेटावर असलेल्या लेम्प्युयांग मंदिराचा दरवाजा “स्वर्गाचा दरवाजा’म्हणून जगविख्यात आहे.

देवदत्त पटनायक

हिंदंूच्या विश्वात देवलोकापेक्षाही अधिक उंचावर असे एक लोक आहे... जिथे कोणत्याही प्रकारचा लोभ नाही. आहे ती फक्त संतुष्टता आणि समाधान... विष्णूचे उपासक याला विष्णुलोक म्हणतात तर महादेवाचे उपासक त्याला शिवलोक म्हणतात. देवलोक म्हणजे फक्त नंदनवन तर विष्णू किंवा शिवलोक म्हणजे ‘हेवन’ ज्याला आपण स्वर्ग म्हणतो.

हिंदूंसाठी ब्रह्मांड ही कल्पना एका गगनचुंबी इमारतीसारखी आहे. पृथ्वी आणि भूलोक त्याच्या मध्यभागी आहेत. भूलोकाच्या वरच्या मजल्यांवरचा आनंद वाढत जातोय. सर्वात वरच्या मजल्यावर, देव-लोक, जे दिवसरात्र अप्सराच्या नृत्यांचा आणि संगीताचा आनंद घेतात. भूलोकाच्या सर्वात खालच्या मजल्यावर मात्र आनंदाचे प्रमाण कमी होत जाते. या मजल्यावर  म्हणजेच पाताळात असुर राहतात. पाताळ लोक हे मणी आणि सोन्याने समृद्ध आहे. म्हणूनच त्याला हिरण्यपुरा किंवा सोन्याची नगरीदेखील म्हटले जाते.

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मृत्यूनंतर मनुष्य हा पितृ- लोकात जातो, वैतरणी नदीच्या पलीकडे... मनुष्याने ज्या प्रकारचे जीवन जगले आहे त्यानुसार त्याला मृत्यू कसा मिळेल आणि तो पुनर्जन्म कुठं घेणार हे यमदेव ठरवत असतो. चांगले कर्म केल्यामुळे मनुष्याला ‌वरच्या मजल्यावर आणि देवलोकातही जागा मिळू शकते. पण वाईट कृत्यामुळे त्याला सगळ्यात खालच्या मजल्यावर जावे लागते अगदी पाताळापर्यंत...

पण इथे एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की देवलोक किंवा स्वर्ग हे “हेवन’ या संकल्पनेपेक्षा वेगळे आहे. स्वर्गाची धारणा ही ख्रिस्ती आणि इस्लामी परंपरांतून येते, जे पुनर्जन्माला मानत नाहीत. त्यांच्यानुसार प्रत्येक व्यक्तीला फक्त एकच आयुष्य लाभतं त्यामुळे त्यांना स्वर्गात जाण्याची एकदाच संधी मिळते. पण हिंदूंमध्ये अनेक स्वर्गांची संकल्पना आहे, ज्यात आनंदही वेगवेगळ्या प्रमाणात असतो, आणि स्वर्गासारखेच नरकही अनेक असतात.


पुनर्जन्मावर विश्वास असल्यामुळे हिंदूंना देवलोकात जाण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतात. परंतु तिथे ते फक्त काही काळासाठीच राहतात. कर्माच्या खात्यातील चांगल्या कर्मांचा भाग संपल्यावर त्यांना देवलोक सोडावं लागतं. चांगली गोष्ट ही आहे की पाताळात लोकांना फार काळ राहावं लागतं नाही. तिथेही चांगले कर्म केल्यास पुन्हा वरच्या माळ्यावर जाण्याची संधी असते, जिथे आनंद जास्त आणि काम कमी आहे. अशा पद्धतीने देव असुर बनू शकतात तर असुर हे देव...

स्वाभाविकपणे असुरांमध्ये देवलोकात जाण्याची लालसा असते. तर देव हे नेहमी तिथेच राहण्याचा कसोशीने प्रयत्न करतात. त्यामुळे देव नेहमी चिरकालीन तरुण आणि अमरत्व देणाऱ्या अमृतासाठी तरसतात. असुरांच्या हल्ल्यांचा धोका नेहमी त्यांना असतो. त्यामुळे देव नेहमी असुरक्षित आणि अस्वस्थ असतात, ज्यामुळे त्यांना स्वर्गातील सुखांचा आनंद व्यवस्थितपणे घेताच येऊ शकत नाही. देवलोकातील निवासी हे खूप भोगी असतात आणि पाताळातील धनवान असतात. पण दोघेही संतुष्ट नाहीत. भोग आणि धन याची लालसा कधीच संपत नाही. त्यामुळे कधीच कुणी सुखी नसते. प्रत्येकाला असेल त्यापेक्षा अधिक मिळविण्याचा लोभ असतो.

म्हणूनच हिंदूंच्या विश्वात देवलोकापेक्षाही अधिक उंचावर असे एक लोक आहे... जिथे कोणत्याही प्रकारचा लोभ नाही. आहे ती फक्त संतुष्टता आणि समाधान... विष्णूचे उपासक याला विष्णुलोक म्हणतात तर महादेवाचे उपासक त्याला  शिवलोक म्हणतात. देवलोक म्हणजे फक्त नंदनवन तर विष्णू किंवा शिवलोक म्हणजे “हेवन’ ज्याला आपण स्वर्ग म्हणतो. हे लोक गाठण्यासाठी चांगले किंवा वाईट कर्मापेक्षाही अधिक सखोल विचार करावा लागतो. तुम्हाला तुमच्या समस्या आणि त्याचे उपाय याबद्दल समभाव निर्माण करावा लागतो. 

या स्थितीला मोक्ष म्हणतात... ज्ञान आणि सर्वांच्या प्रति प्रेमभावनांमुळे या ठिकाणी तुम्ही कायम आनंदमय आणि शांत राहू शकता.


शास्त्रांनुसार आपली प्रवृत्ती बदलून आपण आपल्या लोकांचा स्वभाव बदलू शकतो. आपण असुर लोक निर्माण करू शकतो, जिथे आपण फक्त अधिकार गाजवण्यावर बोलतो. आपण देवलोक निर्माण करू शकतो जिथे आपण सर्वच गोष्टींचा आनंद घेऊ शकतो. पण आपण विष्णू आणि शिवलोक निर्माण केला तर तिथं शांती आणि समाधान दोन्हीही मिळू शकतं...


देवदत्त पटनायक
divyamarathirasik@gmail.com
 

बातम्या आणखी आहेत...