Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Which Is Tea Good For Your Health

आपल्या ब्लड ग्रुपनुसार प्या चहा, आरोग्याला ठरते लाभदायक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 11, 2019, 12:00 AM IST

डॉ. अमिता सिंह सांगत आहेत काही टिप्स

 • Which Is Tea Good For Your Health

  अमेरिकन जर्नल ऑफ क्लीनिकल न्यूट्रीशनच्या संशोधनात सिध्द झाले आहे की, जे लोक आपल्या ब्लड ग्रुपनुसार डायट घेतात, ते आजारांपासून दूर राहतात. जर आपण आपल्या ब्लड ग्रुपनुसार चहा प्यायला तर यामुळे आजारांचा धोका टाळता येऊ शकतो. फूड अँड न्यूट्रीशन एक्सपर्ट डॉ. अमिता सिंह सांगत आहेत की, कोणत्या ब्लड ग्रुपच्या व्यक्तीने कसा चहा प्यावा आणि त्याचे फायदे काय होतील...

  पॉझिटव्ह आणि निगेटिव्हवर एकच नियम
  ब्लड ग्रुपनुसार चहा सिलेक्शन करताना फक्त ब्लड टाइपवर लक्ष देण्याची गरज आहे. उदाहरण म्हणजे, 'O' ब्लड ग्रुपच्या सर्व लोकांना एकाच प्रकारची चहा घ्यायची आहे. मग तुमचा ब्लड ग्रुप ओ पॉझिटव्ह आहे की निगेटिव्ह याने फरक पडत नाही. हा नियम प्रत्येक ब्लड ग्रुपसाठी लागू होतो.

  1. ए ब्लड ग्रुप
  या ब्लड ग्रुपच्या लोकांमध्ये स्ट्रेस हार्मोन्स जास्त रिलीज होतात.
  - काय प्यावे
  डोके शांत ठेवण्यासाठी ग्रीन टी किंवा ओव्याची चहा प्यावी.

  2. ब्लड ग्रुप बी
  या ब्लड ग्रुपच्या लोकांचे वजन लवकर वाढते आणि त्यांना थकवा लवकर येतो.
  - काय प्यावे
  लेमन टी, ग्रीन टी किंवा तेजपत्त्याचा चहा प्यावा. याने थकवा कमी होतो, वेट लॉसमध्ये फायदेशीर आहे.

  3. ए बी ब्लड ग्रुप
  या ब्लड ग्रुपचे लोक हसमुख असतात परंतु त्यांच्यामध्ये अॅक्टिव्हनेस कमी असतो.
  - काय प्यावे
  साधा चहा प्यावा आणि कॉफी पिणे टाळावे.

  4. ब्लड ग्रुप ओ
  या ब्लड ग्रुपच्या लोकांना पोटाची समस्या जास्त राहते.
  - काय प्यावे
  साधा किंवा अद्रकचा चहा प्यावा. हे पोटासाठी फायदेशीर असते.

Trending