Home | Jeevan Mantra | Jyotish | Vastu Shastra | Which Type Of Ganesh Statue Is Best For Home Ganesh chaturthi

श्रीगणेशाची मूर्ती घरात स्थापन करण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी

रिलिजन डेस्क | Update - Sep 10, 2018, 11:49 AM IST

श्रीगणेशाला वक्रतुंडही म्हटले जाते. या शब्दाचा अर्थ वळवलेली सोंड. श्रीगणेशाचे हेसुद्धा एक सुंदर स्वरूप असून यामध्ये यांच

 • Which Type Of Ganesh Statue Is Best For Home Ganesh chaturthi

  श्रीगणेशाला वक्रतुंडही म्हटले जाते. या शब्दाचा अर्थ वळवलेली सोंड. श्रीगणेशाचे हेसुद्धा एक सुंदर स्वरूप असून यामध्ये यांची सोंड उजव्या किंवा डाव्या बाजूला वळलेली असते. गुरुवार 13 सप्टेंबरपासून गणेश उत्सव सुरु होत असून हा उत्सव 23 सप्टेंबरपर्यंत राहील. गुरुवारी घराघरात श्रीगणेशाची स्थापना केली जाईल. श्रीगणेश मूर्तीच्या सोंडसंदर्भात वेगवेगळे मतभेद आहेत. उजव्या की डाव्या सोंडेचा गणपती शुभ राहतो याविषयी अनेक लोकांना माहिती नसावी. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, घरातील श्रीगणेशाची सोंड डाव्या बाजूला असावी की उजव्या बाजूला.


  घरासाठी जास्त शुभ ठरतो डाव्या सोंडेचा गणपती
  पं. शर्मा यांच्यानुसार घरामध्ये नेहमी डाव्या सोंडेची गणेश मूर्ती स्थापन करावी. घराच्या मुख्य दरवाजावर गणेश मूर्ती लावायची असल्यास त्या मूर्तीची सोंड डाव्या बाजूला असावी.


  या मूर्तीमुळे कायम राहते सकारात्मकता
  डाव्या सोंडेचा गणपती घरात असल्यास घरामध्ये नेहमी सकारात्मकता राहते. अशाप्रकारच्या गणेश मूर्तीमुळे घरातील वातावरण संतुलित राहते.


  वास्तुदोष दूर करण्यासाठी ब्रह्म स्थानावर ठेवावी गणेश मूर्ती
  घरमाध्य मध्य भागाला ब्रह्म स्थान म्हणतात. या जागेचे कारक तत्त्व पृथ्वी आहे. घरामध्ये स्थापित गणेश मूर्ती पिवळ्या मातीची असल्यास हे अत्यंत शुभ राहते. घरामध्ये अशाप्रकारची डाव्या सोंडेची गणेश मूर्ती स्थापन केल्यास घरातील विविध वास्तुदोष नष्ट होतात.


  पुढे वाचा, घरात का ठेवू नये उजव्या सोंडेचा गणपती...

 • Which Type Of Ganesh Statue Is Best For Home Ganesh chaturthi

  > शास्त्रानुसार उजव्या बाजूला सोंड असलेले श्रीगणेश हट्टी स्वभावाचे असतात. यांचे पूजन कर्म सोपे नाही. अशाप्रकारच्या गणेश मूर्ती पूजेमध्ये कोणत्याही प्रकराची चूक होता कामा नये. अशाप्रकारच्या गणेश मूर्ती पूजेने श्रीगणेश उशिरा प्रसन्न होतात.

 • Which Type Of Ganesh Statue Is Best For Home Ganesh chaturthi

  > सामन्यतः उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा तंत्र विधीनुसार केली जाते. यांचा पूजन विधी अत्यंत कठीण असतो आणि यामुळे सामान्य लोकांना डाव्या सोंडेच्या गणपतीची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो.

Trending