आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पोर्ट डेस्क- विश्वचषकातील पहिला उपांत्य सामना आज मॅनचेस्टरमध्ये भारत आणि न्यूजीलंड यांच्यात खेळला जाईल. सामन्याच्या एक दिवस आधी भारतीय कर्णधार विराट कोहली म्हणाला की, "जो संघ सामन्याला चांगल्यारितीने निभावू शकेल, त्याच्याकडे सामना जिंकण्याची संधी आहे. आम्ही अनेक नॉकआउट सामने खेळलो आहोत. दोन्ही संघावर सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याची जबाबदारी आहे. जो संघ दबावात चांगली कामगिरी करेल, तो विजेता ठरेल."
पुढे तो म्हणाला, "सामन्यादरम्यान बरोबर निर्णय घेणे हे महत्त्वाचे आहे. दोन्ही संघाकडे अशा परिस्थितीत खेळण्याचा अनुभव आहे. न्यूजीलंडचा संघ मागिल विश्वचषकात अंतिम सामना खेळला आहे. त्यांना नॉकआउट सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्यांनी या विश्वचषकातही चांगली कामगिरी केली आहे."
'विलियम्सन मैच को अपने अनुसार चलाते हैं'
कोहलीने दबावाबद्दल सांगितले, "सगळे सामने दबावात खेळावे लागतात. कोणताच सामना सोपा नसतो. जिंकणे हेच आमचे लक्ष आहे. या सामन्यात खूप दबाव असेल. केन विलियम्सन सामन्याला आपल्यानुसार खेळवतात. रॉस टेलरसोबत ते न्यूजीलंडच्या संघाचे महत्त्वाचे खेळडू आहेत. त्या दोघांची विकेट आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे."
'भारतीय टीम के लिए धोनी का योगदान बेहतरीन'
धोनीच्या कामगिरीबद्दल विचारल्यावर कोहली म्हणाला, "त्याने भारतीय संघासाठी जे योगदान दिले आहे, ते खूप अतुलनिय आहे. मी त्याच्या नेतृत्त्वात खेळणे सुरू केले होते. माझ्या मना त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. ते नेहमी आनंदी राहतात. ते मला चांगला सल्ला देतात. मी त्यांच्यासोबत इतक्या वर्षे खेळून स्वतःला भाग्यवान समजतो.
'कोणीच 5 शतकांबद्दल विचार केला नव्हता'
कोहलीने रोहीतचे कौतुक करताना म्हणाला की, "माझ्या हिशोबाने तो जगातील सर्वोकृष्ट फलंदाज आहे. मला खात्री आहे की, आजच्या सामन्यतही तो चांगले प्रदर्शन करेल. कोणीच 5 शतके लावण्याबाबत विचार केला नव्हता."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.