आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्र जप करताना अवश्य लक्षात ठेवा या गोष्टी, प्राप्त होईल शुभफळ

2 वर्षांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मामध्ये पूजन कर्मात मंत्राचे विशेष महत्त्व आहे. धर्म ग्रंथानुसार मंत्र खूप प्रभावी असतात. यांच्या प्रभावाने अशुभ ग्रहांचे दोष दूर होऊन सुख-शांती, यश प्राप्त केले जाऊ शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार मंत्र जप करताना काही लोक चुकाही करतात, ज्यामुळे मंत्राचे पूर्ण फळ त्यांना मिळू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही चुकांविषयी सांगत आहोत...

1. वैदिक मंत्राचा जप सकाळी किंवा संध्याकाळी करावा. तंत्रशी संबंधित मंत्राचा जप रात्री केला जाऊ शकतो.

2. मंत्र जपाची वेळ एकच असावी, वारंवार बदलू नये. वारंवार जपाची वेळ बदलल्यास त्याचे पूर्ण फळ मिळू शकत नाही.

3. एकदा मंत्र जप सुरु केल्यानंतर वारंवार ठिकाण बदलू नये. मंत्र जप करण्यासाठी एकच स्थान निश्चित करावे.

4. मंत्र जप सुरु करण्यापूर्वी एखाद्या विद्वानाकडून माळेची माहिती अवश्य घ्यावी. चुकीच्या माळेचा उपयोग केल्यास मंत्र जपाचे पूर्ण फळ मिळत नाही.

5. मंत्र जपासाठी पाट, सुती चटई किंवा आसनावर बसने श्रेष्ठ राहते. सिंथेटिक आसनावर बसून मंत्र जप करू नये.

6. मंत्र जप करताना माळ इतरांना दाखवू नये. आपले डोकेही कपड्याने झाकून घ्यावे.

7. माळ फिरवण्यासाठी अंगठा आणि मधल्या बोटाचा उपयोग करावा.

बातम्या आणखी आहेत...