आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • While Waiting For The Restaurant Menu In The Office Cafeteria, Scanned And Put On The Website, Zomato's Idea Came To Me Due To Increased Traffic

ऑफिस कॅफेटेरियामध्ये रेस्तराँ मेन्यूसाठी वाट पाहावी लागत होती, स्कॅन करून वेबसाइटवर टाकला, वाढत्या रहदारीमुळे झोमॅटोला कल्पना सुचली

2 वर्षांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • 2008 मध्ये सुरू झालेल्या कंपनीकडे 8 कोटी युजर्स
  • आपण आपल्या चुका आणि इतरांच्या अनुभवांतून शिकले पाहिजे, याच गोष्टी आयुष्य पुढे नेतात
  • 11 वर्षांपूर्वी बंगळुरूतून सुरू झाला व्यवसाय, सध्या 24 देशांतील 10 हजारांवर शहरात

​​​​​​नवी दिल्ली : केवळ ११ वर्षांपूर्वी बंगळुरूत सुरू झालेले झोमॅटो जगात १० हजारांवर शहरांत पोहोचले आहे. २४ देशांपर्यंत पोहोचलेल्या या कंपनीचा वेग त्याच्या डिलिव्हरी सेेवेपेक्षाही अनेक पट वेगवान आहे. २००८ मध्ये फूडी-बे नावाने सुरू झालेल्या या कंपनीकडे ८ कोटी अॅक्टिव्ह युजर्स आहेत. झोमॅटोने जगातील १२ स्टार्टअपचे अधिग्रहण केले आहे. सीईओ दीपिंदर गोयल यांच्या यशाची कहाणी त्यांच्याच शब्दात...

२००८ मध्ये मी आणि पंकज लढ्ढा(झोमॅटोचे सहसंस्थापक) एका अमेरिकी व्यवस्थापन कन्सल्टन्सीसोबत काम करत होते. आम्हाला लंचमध्ये अनेकदा जेवण मागवत होतो. लंचवेळी रेस्तराँ मेन्यूमधून पदार्थ ठरवणे खूप कठीण होत होते. दररोज ऑफिस कॅफेटेरियामध्ये जेवण ऑर्डर करण्यासाठी कठीण जात होते. दररोज कॅफेटेरियामध्ये जेवण मागण्यासाठी रेस्तराँ मेन्यूसाठी रांग लावावी लागत होती. बरेच जण मेन्यू हरवत होते,त्यामुळे ते आपल्या डेस्कवर आणण्यासही मनाई होती.

सर्वांची त्रासापासून सुटका करण्यासाठी मी एक दिवस तो स्कॅन करून मेन्यू ऑनलाइन केला. यामुळे लवकरच या वेबसाइटला चांगल्या हिट्स मिळू लागल्या. या स्कॅन मेन्यूच्या आसपास व्यवसाय उभा करू शकतो,असे मला वाटले. या पद्धतीने झोमॅटो(फूडीबे)चा जन्म झाला. लवकरच रेस्तराँ प्रिमियम लिस्टिंगबाबत चौकशी करू लागले. असे बिझनेस मॉडेल उभे राहू शकते, अशी आम्हाला कल्पना सुचली.

सुरुवातीस आम्ही लोक शहरा-शहरात जाऊन रेस्तराँकडून त्यांचे मेन्यू गोळा करत होता आणि ते आपल्या साइटवर टाकत होतो. लोक साइटवर जास्त माहिती शोधत आहे,हे आम्हाला समजले. आम्ही मेन्यूसोबत रेस्तराँ अॅड्रेस, किंमत, तज्ज्ञ, टॉप डिश यासारखी माहिती टाकण्यास सुरुवात केली. आमच्यासारखे विचार करणाऱ्या सोबत संघटित रूपात कामास सुरुवात केली. अशा पद्धतीने झोमॅटोचा सुवर्ण प्रवास सुरू झाला.

सुरुवातीस आम्हाला खूप साऱ्या समस्यांना सामोरे जावे लागले. आम्ही रेस्तराँ व ग्राहकांमध्ये पुलाचे काम करत आहोत हे रेस्तराँना समजून सांगणे कठीण होते. यामुळे तुमच्या व्यवसायाला नवी उंची मिळेल,असे सांगितले. मात्र, मी कायम उद्योजकासारखा विचार करत होतो. मी जास्त बोलण्याऐवजी विश्वास ठेवत होतो. आपणास आपल्या चुका, यश आणि दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकले पाहिजे. ही बाब आपणास कायम पुढे आणते.

जेवणाला कोणता धर्म नसतो, या टि्वटने वाद

जेवणाला कोणता धर्म नसतो, झोमॅटोचे हे टि्वट या वर्षी सर्वात चर्चित आणि वादग्रस्त टि्वटपैकी एक राहिले. एका ग्राहकाने झोमॅटोकडून जेवणाची ऑर्डर मागवली. डिलिव्हरी मॅन मुस्लिम होता. ग्राहकाने त्याच्या धर्माचा हवाला देत ऑर्डर रद्द करून टि्वट केले. झोमॅटोने उत्तर दिले, जेवणाला कोणताही धर्म नसतो. खूप साऱ्या लोकांनी या उत्तराचे कौतुक केले तर दुसरीकडे अनेकांनी यासाठी कंपनीवर टीका केली. लॉग आऊट कँपेननेही कंपनी वादात सापडली होती.

वर्षात महसूल तिप्पट वाढला

  • झोमॅटोचा एप्रिल- सप्टेंबर २०१९ मध्ये महसूल तिप्पट वाढून १,४५८ कोटी पोहोचला. वर्षाच्या समान अवधीत हा ४४८ कोटी रुपये होता.
  • नुकतेच ४,२७७ कोटींचा निधी मिळाला.
  • या वर्षी एप्रिलमध्ये कंपनीला मासिक ऑर्डर ४ कोटी होती.

दीपिंदर गोयल