आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • White Horse Painted Black And Sold For 17lakhs In Faridkot Punjab Case Registered Against 8 For Fraud

उच्च प्रजातीच्‍या घोड्याची 24 लाख रूपये सांगितली किंमत, 17.50 लाखात ठरवला सौदा, पण काही दिवसांनंतर समोर आली आश्‍चर्य करायला लावणारी गोष्‍ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फरीदकोट (पंजाब) -  पंजाबच्‍या फरीदकोट येथे एका व्‍यापा-याने पांढ-या घोड्याला काळा रंग फासुन घोडा मारवाडी प्रजातीचा असल्याचे सांगून 17.5 लाखांना विकला. काही दिवसांनंतर हळूहळू घोड्याचा रंग उडाला. अचानक झालेल्‍या या बदलामुळे घोड्याचा मालक गडबडला. नंतर त्‍यांच्‍या लक्षात आले की त्‍यांची फसवणूक झाली आहे.  


8 जणांविरूद्ध फसवणुकीचा गुन्‍हा दाखल.
याबाबत पोलिसांनी 8 जणांविरूद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. पण आतापर्यंत कुणालाही अटक करण्‍यात आली नाही. फरीदकोट येथील रहिवासी करणबीर इंदरसिंग सेखो यांनी सांगितले की, नोव्‍हेंबर 2017 रोजी व्‍यापारी मेवा सिंग आणि त्‍याचे साथीदार यांच्‍याकडुन घोडा खरेदी केला होता. घोडा राजस्थानच्‍या सर्वांत उच्‍च मारवाडी प्रजातीचा असुन त्‍याची किंमत 24 लाख रूपये असल्‍याचे व्‍यापा-याने सांगि‍तले. नंतर 17.5 लाख रूपयांमध्‍ये घोडा करणबीर यांनी विकत. घेतला. फरीदकोट शहर पोलिसचे इकबाल सिंह यांनी सांगितले की, याबाबत मेवा सिंह आणि त्‍याच्‍या आई-वडीलांसमवेत 8 जणांविरूद्ध फसवणुकीचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला असुन आरोपींचा तपास सुरू आहे.


आम्‍ही मेवा सिंग आणि त्‍यांच्‍या साथिदारांशी संपर्क करण्‍याचा प्रयत्‍न केला परंतु, त्‍यांच्‍याकडुन कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्‍यानंतर आमची फसवणुक झाल्‍याचे लक्षात आले. आमच्‍या प्रमाणेच इतर ब-याच लोकांची या टोळीने फसवणुक केल्‍याचा आरोप सेखों यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...