आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराख्राइस्टचर्च - न्यूझीलंडमधील ख्राइस्टचर्च शहरात गत १५ मार्चला २ मशिदींवरील हल्ल्यांनी दक्षिण-प्रशांतचे हे बेट सुरक्षित असल्याचा समज माेडून काढला. व्हाइट सुप्रीमसी म्हणजे श्वेत सर्वोच्चता किंवा प्रभुत्व (श्वेतवर्णीयांना श्रेष्ठ सांगणारा वंशभेदी विचार) पश्चिमेकडील जगासाठी तितकीच धाेकादायक बनलीय, जितकी कट्टर इस्लामच्या नावावर होत असलेल्या दहशतवादास धाेकादायक मानते, हेही या घटनेतून सिद्ध झाले अाहे. ख्राइस्टचर्चमध्ये ५० जणांचे प्राण घेणाऱ्या हल्लेखाेरानेही प्रवाशांविराेधातील आंतरराष्ट्रीय अभियानाच्या नावावर श्वेत राष्ट्रवादाचीच अाठवण करून दिली असून, यातून दक्षिणपंथी कट्टरवाद पुन्हा चर्चेत अालाय. याबाबतची आकडेवारी हेदेखील सांगते की, श्वेत सर्वोच्चतावादातही वेगाने वाढ झाली आहे.
‘वाॅशिंग्टन पोस्ट’नुसार २०१७ मध्ये अमेरिकी तपास संस्थांनी सांगितले हाेते की, आम्ही श्वेत सर्वोच्चता व स्थानिक दहशतवादी धमक्यांशी निगडित सुमारे १,००० प्रकरणांचा तपास करत आहाेत. यादरम्यान या संस्था इस्लामिक स्टेटने प्रेरित दहशतवादाच्या जवळपास इतक्याच प्रकरणांचा तपास करत हाेत्या. युनिव्हर्सिटी ऑफ मेरीगोल्डच्या ‘ग्लोबल टेररिझम डेटाबेस’नुसार २०१२ ते २०१७ दरम्यान श्वेत सर्वोच्चतावाद्यांचे हल्ले दुप्पट वाढलेत. दुसरीकडे युरोपातही मुस्लिम प्रवाशांबद्दल अतिदक्षिणपंथी तीव्र संताप व्यक्त करत आहेत व यातून अनेकदा या सर्वोच्चतावाद्यांनी हिंसाचार घडवला आहे. २०१६-१७ दरम्यान युरोपात अतिदक्षिणपंथीयांच्या हल्ल्यांत ४३ % वाढ झाली अाहे. ब्रिटनमध्ये प्रवाशांप्रती भीती व द्वेष किती वाढला आहे याचा अंदाज यावरून लावता येताे की, याचा परिणाम ब्रेक्झिटशी संबंधित निर्णयावरही झाला व ईयूतून ‘बाहेर पडण्याच्या’ बाजूने मतदान करणाऱ्या ५४% मतदारांनी इस्लामला ब्रिटिशांसाठी धाेकादायक असल्याचे सांगितले. ‘श्वेत सर्वोच्चता’ म्हणजेच ‘श्वेत राष्ट्रवाद’ वाढण्यामागे इंटरनेट माेठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे. कट्टरवाद्यांवर संशोधन करणारे जे.एम.बर्गर यांनी त्यांच्या एका ट्विटमध्ये २०१६ च्या अभ्यासाचा उल्लेख केला अाहे. त्यात लिहिले आहे की, ‘२०१२ नंतरपासून अमेरिकी श्वेत राष्ट्रवादी आंदोलनांचे फॉलोअर्स ६०० % वाढले. आज तेे राेज ट्विट व फालोअर्सच्या संख्येत इसिसपेक्षाही पुढे आहेत. अलीकडेच ‘मिलिट्री टाइम्स’ने केलेल्या सर्वेक्षणात २२ % सर्व्हिस मेंबर्सनी आम्हाला सैन्य दलात ‘श्वेत राष्ट्रवाद’ किंवा मग वंशवादी विचारांची लक्षण दिसत, तर ३५ % सदस्यांनी ‘श्वेत राष्ट्रवाद’ हा देशासाठी माेठा धाेका असल्याचे सांगितले.
न्यूझीलंडच्या पंतप्रधान म्हणाल्या- रिफ्यूजी कोटा ५० % वाढवणार
या घटनेनंतरही न्यूझीलंडने याबाबतची भूमिका बदललेली नाही. देशाच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी सांगितले की, अाम्ही पुढील वर्षापासून वार्षिक रिफ्यूजी कोटा १००० वरून वाढवून १५०० करू. न्यूझीलंडच्या एकतेच्या भावनेने परिपूर्ण संस्कृतीनंतरही सर्व काही अालबेल नसल्याची अनुभूती येत अाहे. म्हणजे, गत ५ वर्षांत इस्लामिक वुमेन्स काैन्सिलने सरकारी संस्थांना मुस्लिम समाजास द्वेषमूलक वागणूक दिली जात असल्याची तक्रार अनेकदा केली; परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.
९/११ पेक्षाही माेठा हाेता हल्ला0
न्यूझीलंडची लाेकसंख्या ४८ लाख असून, १५ मार्चला झालेल्या हल्ल्यात ५० नागरिकांना प्राण गमावावे लागलेत. लाेकसंख्येच्या प्रमाणानुसार विचार केल्यास अमेरिकेच्या ९/११ दहशतवादी हल्ल्यात झालेल्या नुकसानीच्या तुलनेत न्यूझीलंडला या हल्ल्यात जास्त नुकसान साेसावे लागले आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प भलेही यांना ‘लोकांचे खूप लहान समूह’ सांगत असले तरी या लाेकांना श्वेत सर्वोच्चतावाद्यांचे समर्थक मानले जाते. मशिदींवर हल्ले करणाऱ्यानेही त्याच्या जाहीरनाम्यात ट्रम्प यांना श्वेत सर्वोच्चतावाद्यांच्या संघर्षाचे प्रतीक म्हटले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.