आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजाराशी झुंजणारा पांढरा वाघ सचिन गेला; महिनाभर होता केवळ सलाइनवर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सहा महिन्यांपासून आजाराशी झुंज देणारा सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील पांढरा वाघ सचिनची अखेर शनिवारी प्राणज्योत मालवली. गेल्या २४ ऑगस्टपासून तो आजारी होता. त्याच्यावर तेव्हापासूनच छोट्या पिंजऱ्यात उपचार सुरू होते. आजारपणामुळे त्याने अन्नपाणी सोडले होेते. महिनाभर केवळ सलाइनवर जिवंत होता. मध्यंतरी त्याची प्रकृती काही प्रमाणात सुधारली होती. मात्र, अशक्तपणा व वृद्धापकाळामुळे तो पिंजऱ्यातच पडून होता. 

 

सचिनचा जन्म जानेवारी महिन्यात २००४ मध्ये भानू आणि प्रिया या जोडीतून सिद्धार्थ उद्यानातच झाला होता. मागील सहा महिन्यांपासून वृद्धापकाळामुळे त्याची तब्येत खालावली होती. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्नही केले. सर्वसाधारणपणे वाघ १६ ते १८ वर्षांपर्यंत जगतात. मृत्युसमयी सचिनचे वय १५ होते. १४ जानेवारीला तो १६ व्या वर्षात पदार्पण करणार होता. परंतु आजारामुळे त्याला चालणेही मुश्कील झाले होते. रविवारी सकाळी ८ वाजता पोस्टमॉर्टेम होऊन ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती उद्यान प्रमुख विजय पाटील यांनी दिली. दोन दिवसांपासून त्याने अन्नपाणी सोडले होते. शनिवारी सायंकाळी ६ वाजता सचिनने प्राण सोडला. 

 

प्राणिसंग्रहालयात आता ११ वाघ 
प्राणिसंग्रहालयात आता ७ पिवळ्या पट्ट्यांचे, एक पांढरा पट्ट्यांचा असे ८ वाघ आणि ३ बिबटे आहेत. त्यापैकी ३ पिवळ्या पट्ट्यांच्या मादी वाघ असून २ बिबट्या मादी आहेत. या वाघांची तब्येत अत्यंत चांगली असल्याचे प्राणिसंग्रहालयाच्या प्रभारी संचालकांनी सांगितले.