आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साकळाईबाबत कोण खोटं बोलतंय, मुख्यमंत्री की जलसंपदामंत्री 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर तालुका : या सरकारमधील लोकांचा खोटं बोल पण रेटून बोल, असा जोरदार कार्यक्रम सुरू आहे. मग कर्जमाफी असो की, नोकरभरती सगळीकडेच खोटेपणा आहे. लोकसभा प्रचारार्थ वाळकी येथील जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेपूर्वी साकळाई पाणी योजनेला मंजुरी देण्याची घोषणा केली आणि विधानसभेत त्यांचेच जलसंपदा मंत्री साकळाईसाठी पाणी शिल्लक नसल्याने ती होऊ शकत नाही असे सांगतात. मग साकळाईबाबत खोटं कोण बोलतंय हे एकदा नक्की करून सांगावे, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.    राष्ट्रवादीचे पारनेर - नगर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार नीलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रेच्या समारोपप्रसंगी त्या अरणगाव, ता. नगर येथे बोलत होत्या. या वेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, घनश्याम शेलार, अभिषेक कळमकर, किसनराव लोटके, अशोक सावंत, बाबाजी तरटे, अशोक झरेकर, सरपंच स्वाती गहिले, उपसरपंच महेश पवार, सुजित कोके, मोहन गहिले, सुधीर कांबळे, डॉ. बबनराव डोंगरे, राज्यकार्यकारिणीचे महेबूब शेख, रविकांत वर्पे आदी उपस्थित होते. या वेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. आमचं पूर्वी काही चुकलं असेल म्हणून लोकांना बदल हवा होता. पण आता जनतेलाच केलेल्या बदलाबद्दलच पश्चातापाची वेळ आली आहे. विरोधात गेले आणि बोलले की भेळ इतकी इडी आणि सीबीआयची नोटीस सहज मिळते. मुलांच्या हट्टापायी वडीलांनी विचार करणच सोडून दिलेले आहे त्यामुळे नगरच राजकारण गमतीशीर झालं.    घोसपुरी एमआयडीसीत औटींचा खोडा  २०१२ च्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात घोसपुरी एमआयडीसी आणि देऊळगाव येथील कार्गेा विमानतळाबाबत सरकार सकारात्मक होते. याबाबत शेतकरी आणि अधिकारी यांच्या बैठकाही झाल्या होत्या. लोकही २७ लाख रुपये एकर प्रमाणे जमीन द्यायला तयार होते, जर ही एमआयडीसी झाली असती, तर येथील हजारो तरुणांना रोजगार मिळाला असता. या भागाचा विकास झाला असता. पण या हेकेखोर लोकप्रतिनिधीने मला यात कोणी विचारत नाही म्हणून या एमआयडीसी कामात खोडा घालून ती होऊ दिली नाही, असा गंभीर आरोप नीलेश लंके यांनी केला.   

बातम्या आणखी आहेत...