आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योजनांचा फायदा कोणाला मिळतो, माहीत नाही? चला या कथेतून समजून घेऊ यात...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोष्ट- मंत्री नीतिकुमार यांना एकदा भाषणासाठी बोलावले गेले. पोहोचताच त्यांनी जोरात विचारले...मी तुम्हाला काय सांगणार आहे हे माहीत आहे काय? उत्तर आले नाही. नीतिकुमार रागात व्यासपीठावरून उतरले. म्हणाले- जर तुम्हाला माहीतच नाही की मी काय बोलणार तर भाषणाचा काय फायदा? काही वेळानंतर ते परत आले तेव्हा तोच प्रश्न विचारला. या वेळी लोक म्हणाले- माहीत आहे.  नीतिकुमार यांना पुन्हा राग आला. म्हणाले- जेव्हा माहीत आहे की काय बोलणार तर भाषणाचा काय फायदा? पुढच्या वेळेस अर्ध्या लोकांनी हो म्हटले, अर्ध्यांनी नाही. त्यानंतरही नीतिकुमार व्यासपीठावरून उतरले. म्हणाले- ज्यांना माहीत आहे मी काय बोलणार, त्यांनी ते इतरांना सांगून द्या, अशी अर्थसंकल्पीय धोरणाची कहाणी आहे...


बजेटवाणी : मोदी सरकारच्या भाषेत समजून घ्या बजेट

 

> अच्छे दिन युवकांसाठी नाहीच 
रोजगारासाठी मोठी योजना आलीच नाही, 
मात्र, देशात बेरोजगारी 230% वाढली
पीयूष गोयल यांनी सांगितले की, विकास झाला तर नोकऱ्या वाढतील. सरकारी आकडेवारीनुसार मोदी सरकारमध्ये नोकऱ्या यूपीए-2 तुलनेत 53% कमी झाल्या.

 

> सबका साथ मिळवण्याचा प्रयत्न
मध्यमवर्गीय, शेतकऱ्यांना खुश केले,  भाषणात भटक्यांपासून एनआरआयपर्यंतचा उल्लेख
गोयल यांनी म्हटले- भटक्या समुदायाच्या जनगणनेनंतर त्यांच्या विकासासाठी आयोग येईल. भारताच्या विकास पाहून एनआरआय समुदाय समाधानी आहेत. 

 

> अबकी बार पुन्हा तेच तेच
लहान व्यावसायिकांपासून 25% सामान सरकार घेणार, परंतु मोठी घोषणा नाही
एमएसएमईसाठी 59 मिमिटांत 1 कोटी रुपयांपर्यंत कर्ज देण्याची घोषणा पुन्हा केली. 25% सामान लहान व्यावसायिकांकडून घेण्याचेही आश्वासन दिले.

 

> स्मार्ट सिटी विसरूनच गेले
2014 मध्ये 7 हजार कोटींची तरतूद होती, आतापर्यंत 2% पेक्षा कमी रक्कम दिली
अर्थसंकल्पीय भाषणात स्मार्ट सिटी योजनेसंदर्भात कोणतीच नवीन घोषणा नाही. यासंदर्भात काही उल्लेखही झाला नाही. 

- 5 वर्षांत स्मार्ट सिटीअंतर्गत केवळ  6% काम झाले.

 

> बेटी बचाओ ची फक्त चर्चाच...
महिलांसाठी अर्थसंकल्पात काहीच घोषणा नाही, उज्ज्वला योजनेचा उल्लेख केला
म्हटले की, उज्ज्वला योजनेअंतर्गत 8 कोटी एलपीजी जोडणी देण्याची योजना आहे.  त्यातील 6 कोटींचे वाटप झाले आहे.  मुद्रा योजनेचा लाभ 70% महिलांनी घेतला.

 

> मन की बात अशी सांगितली
2030 पर्यंतचे व्हिजन : संपूर्ण भारत डिजिटल होणार, डिजिटल अर्थव्यवस्थेचे निर्माण होणार
अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, 2030 पर्यंत संपूर्ण भारत डिजिटल होणार आहे. तसेच प्रदूषणमुक्त होईल. सरकारने या व्हिजनचे एकूण 10 पैलू उलगडले.

 

बातम्या आणखी आहेत...