आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विलासरावांच्या तालमीत शिकलेले एकमेकांच्या विरोधात आखाड्यात!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर : स्वर्गीय विलासराव देशमुख आणि लातूरचे राजकारण यांना एकमेकांपासून वेगळे करणे कठीण आहे. शहरात सध्या कार्यरत असलेले विविध पक्षांचे बहुतांश पदाधिकारी त्यांच्याच तालमीत घडले. ते गेल्यानंतर अनेकांना पुढच्या पिढीचे विचार न पटल्यामुळे त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. एकाच तालमीत, एकाच गुरूकडून तयार झालेले हे पठ्ठे या वेळी विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात एकमेकांच्या विराेधात शड्डू ठाेकून उभे अाहेत.


विद्यमान आमदार जरी काँग्रेसचे असले तरी स्थानिक स्वराज्य संस्था मात्र भाजपकडे आहे. पाणी, रोजगार, रस्ते, एमआयडीसीचे विस्तारीकरण हे प्रमुख मुद्दे घेऊन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसकडून अमित देशमुख, भाजपकडून शैलेश लाहोटी आणि वंचित बहुजन आघाडीकडून राजासाहेब मणियार उमेदवार आहेत. या तिघांनाही विलासराव देशमुख यांनी राजकीय धडे देत त्यांची कारकिर्द घडवली.

विद्यमान आमदार जरी काँग्रेसचे असले तरी स्थानिक स्वराज्य संस्था मात्र भाजपकडे आहे. पाणी, रोजगार, रस्ते, एमआयडीसीचे विस्तारीकरण हे प्रमुख मुद्दे घेऊन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसकडून अमित देशमुख, भाजपकडून शैलेश लाहोटी आणि वंचित बहुजन आघाडीकडून राजासाहेब मणियार उमेदवार आहेत. या तिघांनाही विलासराव देशमुख यांनी राजकीय धडे देत त्यांची कारकिर्द घडवली.

जनता एकदा फसली, पुन्हा फसणार नाही.
केंद्रात, राज्यात आणि लातूरमधील स्थानिक स्वराज्य संस्थेत जनतेने भाजप-शिवसेनेवर विश्वास ठेवला, मात्र त्यांचा सपशेल भ्रमनिरास झाला. अजूनही लातूरकरांचा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. भाजपने दिलेली इतर आश्वासने देखील फोल ठरली. त्यामुळे लातूरचा विकास कोण करू शकतो आणि काेणी केला आहे हे लातूरकरांना चांगलेच माहिती आहे. त्यामुळे या वेळी जनता भूलथापांना बळी पडणार नाही, असे मत काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुख यांनी व्यक्त केले.

विलासराव गेल्यानंतर लातूरमध्ये काँग्रेसचा गड कायम राखण्यात अमित देशमुख काही प्रमाणात का हाेईना यशस्वी ठरले आहेत. तरुणांसह ज्येष्ठांमध्येही त्यांची आकर्षण आहे. यावेळी त्यांचे सर्वात लहान भाऊ धीरज देशमुख हे देखील लातूर ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आहेत. रितेश देशमुख त्यांच्या प्रचारासाठी लातूरमध्ये तळ ठोकून आहेत. कायम मुुंबईला असणे व शहराला पाणी न मिळाल्यामुळे काही प्रमाणात जनता विद्यमान आमदारावर नाराज असल्याची चर्चा आहे.

यांनी कधीच प्रश्न मांडले नाही : विलासराव देशमुख यांनी लाहोटी यांना काँग्रेसकडून उपनगराध्यक्षपद दिले होते. अमित देशमुख यांच्या राजकीय लॉन्चिगच्या वेळी लाहोटी सोबतच होते. विधानसभेत लातूरमधील पाण्याचा प्रश्न विद्यमान आमदारांनी कधी लावून धरलाच नाही. त्यामुळे उजनी धरणातले पाणी शहराला मिळाले नाही. ही वेळ या घराणेशाही मुळेच आली असल्याचा अाराेप भाजपचे उमेदवार शैलेश लाहोटी यांनी केला आहे. लातूरकरांना बदल हवा आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी मिळून मी ७० हजारांच्या घरात मते घेतली. या वेळी मात्र आम्ही नियोजन करून मैदानात उतरलो आहे. शिवसेना देखील आमच्या सोबत आहे. त्यामुळे सव्वालाख मतांचे गणित आम्ही बांधले आहे. निवडून आल्यानंतर शहरासाठी पाणी आणणे हे प्राधान्याने केले जाईलच, शिवाय युती सरकारने लातूरमध्ये रेल्वेच्या बोगी तयार करण्याचा कारखाना सुरू करण्याचे काम सुरू केले आहे. त्यातूनही हजारो तरुणांना रोजगार मिळेल, असे लाहाेटी सांगतात.

विलासराव असते तर आम्हाला उभं राहण्याची वेळच आली नसती : विलासराव देशमुख यांच्या तालमीत आम्ही घडलो आहोत. लातूरचा विकास करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ते असते तर मला निवडणूक लढवण्याची वेळच आली नसती, मात्र ते गेले आणि हे शहर पोरके झाले. विकास थांबला म्हणून आम्हाला उभे रहावे लागले, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजासाहेब मणियार यांनी केला आहे. ते अत्तापर्यंत एकदा काँग्रसकडून तर तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रसकडून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये त्यांनी जिल्हा पातळीवर संघटनात्मक पदेही भूषवली आहेत. ते सांगतात की, आमची लढत थेट भाजपशी आहे. काँग्रेस आमच्या स्पर्धेतच नाही. विद्यमान आमदारांचा जनसंपर्क संपला आहे. कायम ते मुंबईतच असतात. लातूर शहराचा पाण्याचा प्रश्न कृत्रिम आहे. जर पाणी नसते तर या भागातील विद्यमान लोकप्रतिनीधींचे सहा साखर कारखाने बंद पडले असते, मात्र केवळ राजकीय वातावरण तापत ठेवण्यासाठी भाजप आणि काँग्रेस यांनी ही कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली आहे. असा आराेप मणियार करतात.

सेनापतीची तलवार अजून म्यानच
लातूर ग्रामीण मतदार संघात काँग्रेसकडून अमित देशमुख यांचे लहान भाऊ धीरज देशमुख तर शिवसेनेकडून श्रीमंत लखोजीराजे जाधवराव देशमुख सिंदखेड राजा यांचे सतरावे वंशज सचिन देशमुख रिंगणात आहेत. पारंपरिक भाजपचा असलेला हा मतदारसंघ यावेळी शिवसेनेला सोडण्यात आला. रेणापूर, मुरूड, भादा असे भाजपने बांधलेले गावे या मतदार संघात आहेत. मात्र थेट योगगुरू रामदेव बाबा यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शिफारस केल्यामुळे मला उमेदवारी मिळाल्याचे सचिन देशमुख सांगतात. विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघांपैकी केवळ या एकच मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार आहे. त्यामुळे शिवसैनिक समोरच्या उमेदवाराला गारद करण्याची तयारी करत आहे. मात्र आमच्या उमेदवाराची तलवार अजून म्यानच असल्याचे शिवसैनिक सांगतात.

बातम्या आणखी आहेत...