आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धडा ज्याच्या लक्षात राहिला, त्याच्या नशिबी सुटी नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उडत उडत आलेली बातमी अशी की, अमिताभ बच्चन आता अभिनयातून संन्यास घेत आहेत. असं म्हणतात की, त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिलेला आहे. पण अशी शक्यता आहे की, काही महिने आराम केल्यानंतर ताजेतवाने होऊन ते पुन्हा सेटवर येतील. 'कुली' चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी झालेल्या जखमेवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार झाले होते आणि एक वेळ तर अशी आली होती की, ते वाचणे कठीण झाले होते. पण अमिताभ यांनी मोठ्या धैर्याने मृत्यूवर मात केली. त्या वेळी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी, अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात आल्या होत्या. एखाद्या अभिनेत्याच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी खुद्द पंतप्रधानांनी असे येण्याची ती पहिलीच वेळ होती. विदेशातून औषधे आणण्याचे काम चित्रपट निर्माते यश जोहर यांनी केले. त्या वेळी अमिताभ यांनी बेडवर पडल्या पडल्या इंग्रजीत कविताही केली होती. त्याचा हिंदी अनुवादही त्यांनीच केला होता. अमिताभने आपल्या आयुष्यात अनेक व्याधींचा सामना केला आहे. कोलकातामध्ये नोकरी करताना डाव्या खांद्याच्या बाजूतून मोठी गाठ काढण्यात आली होती. तेथे अजूनही खड्डा असून तेथे पॅड लावण्यात आले आहे. ते 'माइसेन्थिया ग्रेविस' या स्नायूविकारानेही त्रस्त होते. मद्य तसेच मांसाहार सोडून अनेक वर्षे झाली. 'कौन बनेगा करोड़पती'च्या शेवटच्या भागाच्या चित्रीकरणावेळीही मानेत वेदना होत होत्या. पण केवळ एक दिवस विश्रांती घेऊन 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सिमल्यास रवाना झाले. शालेय जीवनात नाटकात अभिनय केल्याबद्दल त्यांना जॅफरे केन्डल पुरस्कार देण्यात आला होता. केन्डल परिवार हा विविध शिक्षण संस्थांमध्ये शेक्सपियरच्या नाटकांचे आयोजन करत असतो. अमिताभ आणि शशी कपूर यांची पहिली भेट केन्डल पुरस्कार वितरण कार्यक्रमात झाली होती. संघर्षाच्या काळात किरकोळ भूमिका करणाऱ्या अमिताभना शशी कपूर यांनी अशी किरकोळ कामे न करता योग्य भूमिकांसाठी वाट पाहा म्हणून सल्ला दिला होता. इतकेच नाही तर पैशाची मदत करण्याचीही तयारी दर्शवली होती. त्यामुळे कृतज्ञता म्हणून आपल्या भावाची भूमिका शशी कपूर यांनाच द्यावी अशी गळ अमिताभ निर्मात्यांना घालत. संघर्षाच्या काळात विनोदी अभिनेते मेहमूद यांच्या घरातही राहिले होते. मेहमूदच्या 'बॉम्बे टू गोवा'मध्येही अमिताभने काम केले होते. इंदिरा गांधी यांच्या शिफारशीमुळे ख्वाजा अहमद अब्बास यांनी अमिताभ बच्चन यांना 'सात हिंदुस्तानी' या आपल्या चित्रपटात संधी दिली होती. याच्या चित्रीकरणावेळी टिनू आनंद यांच्याशी त्यांची दुसरी भेट झाली. पहिली भेट कोलकातामध्ये झाली होती. तेव्हा टिनू आनंद यांनी अमिताभ यांना जवळून चित्रीकरण पाहण्याची संधी दिली होती. त्याची परतफेड म्हणून अमिताभ बच्चन टॉपवर असताना टिनू आनंद यांच्या 'कालिया'मध्ये अभिनय केला होता आणि आपल्या 'मेजर साहब' चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांच्याकडे सोपवले होते. खरे पाहता चित्रपट उद्योगात कोणी निवृत्त होत नसतो, पेन्शनची सुविधाही असत नाही. अमिताभ बच्चन प्रतिभाशाली आणि मेहनती आहेत. नेहमी वेळेवरच सेटवर येतात. मानधन घेताना मात्र एक पैसा कमी किंवा जास्त घेत नाहीत. हरिवंशराय बच्चन यांनी आपले आत्मचरित्र मोठ्या धाडसाने आणि प्रामाणिकपणे लिहिले आहे. पण अमिताभ बच्चन यांना आत्मचरित्र लिहायला आवडत नाही. आजकाल 'ब्लॉग' लिहिले जातात. अमिताभ बच्चन यांच्या हाताची कर्मरेखा मोठी आहे. चित्रपट उद्योगात कार्यरत सर्व लोकांच्या जीवनाचा एकच मंत्र आहे, 'जीना यहां मरना यहां, इसके सिवा जाना कहां।' जयप्रकाश चौकसे चित्रपट समीक्षक jpchoukse@dbcorp.in