आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Alert: दूध नाही विष पिताहेत तमात भारतीय; उत्पादन 14 कोटी लीटर, पण विक्री 64 कोटी लीटर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अॅनिमल वेल्फेयर बोर्डाचे सदस्य मोहनसिंह अहलुवालिया म्हणाले की, देशात विक्री होणारे 68.7 टक्के दूध आणि दुधापासून बनलेले प्रोडक्ट भेसळयुक्त आहेत. हे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) कडून निश्चित स्टँडर्डच्या जवळपासही नाहीत.


विक्रीपेक्षा 68% कमी होत आहे उत्पादन
सायन्स अँड टेक्नोलॉजी मिनिस्टरीच्या एका स्टेटमेंटचा हवाला देताना अहलुवालिया म्हणाले की, भेसळीच्या तब्बल 89 टक्के प्रोडक्टमध्ये एक वा दोन प्रकारची भेसळ असते. ते म्हणाले की, 31 मार्च 2018 रोजी देशातील दूधाचे दररोजचे एकूण उत्पादन 14.68 कोटी लीटर नोंदवण्यात आले. तर देशातील दुधाची प्रति व्यक्ति विक्री 480 ग्रॅम प्रति दिन आहे. थेटपणे ही विक्री तब्बल 68 टक्के होते.

 

उत्तरेकडील राज्यांत भेसळीची जास्त प्रकरणे
अहलुवालिया यांच्या मते, दक्षिणी राज्यांच्या तुलनेत उत्तरेकडील राज्यांमध्ये दुधामध्ये भेसळीची जास्त प्रकरणे समोर आलेली आहेत. दुधात भेसळीवरून काही वर्षांपूर्वी देशात एक सर्व्हे झाला होता. यात आढळले की, दूध पॅक करताना स्वच्छतेकडे प्रचंड दुर्लक्ष केले जात आहे. दुधात डिटर्जंट थेटपणे मिसळले जाते. अहलूवालिया म्हणाले, ही भेसळ म्हणजे भारतीयांच्या जिवाशी खेळ आहे. याचे दुष्परिणाम होऊन शारीरिक अवयव काम करणे बंद करू शकतात.

 

...तर 2025 पर्यंत 87 टक्के लोकसंख्येला होईल कॅन्सर

जागतिक आरोग्य संघटनेने दूधातील भेसळीवरून नुकतीच भारत सरकारसाठी मार्गदर्शिका जारी केली होती. यानुसार, जर दूध आणि दूधापासून बनलेल्या प्रॉडक्टमध्ये भेसळीवर लगाम लावला नाही, तर देशातील तब्बल 87 टक्के लोकसंख्या 2025 पर्यंत कॅन्सरसारखा खतरनाक आणि जीवघेणा आजार होण्याची दाट शक्यता आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...