आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Who Will Be Casted For Akshay's Upcoming Movie 'Bachchan Pandey' Kriti Or Tamanna ?

आगामी चित्रपट 'बच्चन पांडे' मध्ये अक्षयच्या अपोजिट कृती की तमन्ना ?, कास्टिंगबद्दल सुरु आहे चर्चा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अक्षय कुमारने अशातच आपला अपकमिंग चित्रपट 'बच्चन पांडे' ची घोषणा केली आहे. हा चित्रपट फरहाद सामजी दिग्दर्शित करत आहेत आणि याची निर्मिती साजिद नाडियाडवाला करणार आहे. चर्चा होती की, यामध्ये अक्षयच्या अपोजिट कृती सेननला कास्ट केले जात आहे. पण आता असे ऐकण्यात आले आहे की, मेकर्स तमन्ना भाटियाच्या नावावरदेखील चर्चा करत आहेत. हा चित्रपट साउथचा हिट चित्रपट वीरमचा रीमेक आहे, ज्यामध्ये फीमेल लीडची भूमिका खूप महत्वपूर्ण आहे. आता या रोलसाठी कृतिसोबतच तमन्नाच्या नावावरदेखील विचार होत आहे. तमन्नाने ओरिजनल चित्रपटात फीमेल लीडचा रोल प्ले केला होता. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे चित्रपटात कृतिचे नाव फायनल होण्याची जास्त शक्यता आहे. तिने यापूर्वी फरहाद आणि साजिदसोबत काम केले आहे, मात्र आणखी निर्णय होणे बाकी आहे. 
 
 

फोटोग्राफर्सला रस्त्यावर कित्येक तास पाहावी लागली कृतीची वाट 
कृती सेननने अशातच आपला वाढदिवस सेलिब्रेट केला आहे. यानिमित्ताने तिने आपल्या घरी एक पार्टी होस्ट केली होती, जिथे तिने मित्रमंडळींसह काही फोटोग्राफर्सलादेखील बोलावले होते. पण जेव्हा फोटोग्राफर्स तिच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांची खूप गैरसोय झाली. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, ‘कृतीच्या टीमच्या वतीने फोटोग्राफर्सला या पार्टीचे मंत्रण मिळाले होते. रात्री 10 वाजता एकही फोटोग्राफर्स कृतीच्या घरी पोहोंचले आणि खाली लॉबीमध्ये उभे राहून पाहुण्यांची वाट पाहू लागले. पण तेव्हा बिल्डिंगच्या वॉचमनने फोटोग्राफर्सला लॉबीमध्ये उभे राहण्यास मनाई केली. जेव्हा कृतीच्या टीमशी संपर्क केला गेला तेव्हा त्यांनी सांगितले की, तुम्ही बाहेर रस्त्यावर जाऊन उभे राहा, जेव्हा पाहुणे येतील तेव्हा तुम्हाला बोलावले जाईल.’ तीन तास वाट पाहिल्यानंतर कृतीच्या अशा वागण्यामुळे फोटोग्राफर्स नाराज होऊन तसेच परतले.