आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताची विश्वकप जिंकण्याची शक्यता सर्वाधिक 66%, दुसरा दावेदार इंग्लंड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि इंग्लंडची दावेदारी या विश्वकपमध्ये सर्वात मजबूत दिसत आहे. संघांची सध्याची कामगिरी, मोठे सामने जिंकण्याचा अनुभव आणि संघांची इंग्लंडच्या पीचवरील खेळी, या तीन निकषांवर या वेळी क्रिकेट विश्वकप जिंकण्याची कोणत्या संघाची किती दावेदारी आहे हे सांगता येते. या तीन निकषांवरील आकडे पाहिले तर भारताची दावेदारी सर्वाधिक ६६ टक्के आहे, तर इंग्लंड ६३.६ % अपेक्षेसह दुसरा मोठा दावेदार आहे. या क्रमात दक्षिण आफ्रिका ५०.२३% अपेक्षेसह टाॅप-३ मध्ये आहे.


टीम इंडियाबाबत बोलायचे तर गेल्या काही वर्षांत सर्वात कन्सिस्टंट टीम ठरली आहे. २०११ चा विश्वकप जिंकला, नंतर २०१५ च्या विश्वकपमध्ये सेमीफायनलपर्यंत पोहोचला. त्याशिवाय अंतिम दोन चॅम्पियन्स ट्राॅफीत एक जिंकला आणि एकात फायनल पर्यंत पोहोचला. त्यावरून भारत एक मजबूत टीम आहे हे स्पष्ट होते. इंग्लंडची कामगिरीही चांगली आहे आणि त्याला होम ग्राउंडचा फायदाही मिळेल. गेल्या दीड वर्षात त्याने ६८.५ टक्के सामने जिंकले आहेत. एकेकाळी म्हटले जात होते की, डच फुटबॉल टीम टोटल फुटबॉल खेळते. आज हीच स्थिती इंग्लंडमध्ये आहे. ते टोटल क्रिकेट खेळतात. त्यांच्याकडे सर्व जण चांगली फलंदाजी करतात. याउलट टीम इंडियात मोहंमद शमी, बुमराह, कुलदीप, चहल हे फलंदाजीत कमकुवत आहेत.


या तीन निकषांच्या आधारावर भारत होऊ शकतो विजेता
या विश्वकपमध्ये तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पहिली-गेल्या दीड वर्षापासून सर्व संघांची कामगिरी कशी आहे? दुसरी-मोठ्या स्पर्धांत मोठ्या संघांची कामगिरी कशी राहते? तिसरी-इंग्लंडमध्ये कोणत्या संघाची कामगिरी कशी आहे? आम्ही या तीन गोष्टींवर आयसीसी रँकिंगच्या टाॅप-६ संघांचे विश्लेषण केले.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, टाॅप-६ संघांचे विश्लेषण...

बातम्या आणखी आहेत...