आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालकामुळे मोलकरनीचे आयुष्य झाले उद्धवस्त, हात जोडून मोलकरीण म्हणाली- साहेब! याच्या मोबदल्यात पैसे घ्या, मालक म्हणाला- मला तर तेच पाहिजे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतियाळा- येथील एका बंगलाच्या सर्वेंट क्वार्टरमध्ये 4 वर्षापासून राहणाऱ्या कुटुंबाने मालकाद्वारे 4 लाख रूपयांचे दागिणे चोरल्याच्या आरोपामुळे दुखी होऊन कालव्यात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 34 वर्षीय रामचंद्र बेपत्ता झाले आहेत, तर त्यांच्या 7 वर्षीय मुलगा युवराजचा मृत्यु झाला आहे. पण त्यांची 28 वर्षीय पत्नी बसंती आणि 10 वर्षीय मुलगी सुष्मिताला लोकांनी वाचवले आहे.  सध्या त्या दोघी रूग्णालयात असून उपाचर सुरू आहेत.


मोलकरीण म्हणाली साहेब पैसे घ्या पण...
रामचंद्रची पत्नी बसंतीने सांगितले, आम्ही बंगल्याच्या मालकांना सांगितले की आम्ही दागिणे नाही चोरले, पण त्यांनी आमचं काहीच ऐकलं नाही आणि पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी आमच्या रूममध्ये शोधले पण काहीच सापडले नाही. पोलिसांनी नवऱ्याला ठाण्यात नेले आणि म्हणाले की, दागिणे चोरले असतील तर सांगा नाहीतर उद्या कारवाई केली जाईल. त्यांना दिवसभर तेथे ठेवले, त्यामुळे त्यांना रात्रभर झोप आली नाही. त्यानंतर ते म्हणाले की, आपण निर्दोष आहोत तरी त्यांना पैसे देऊत नाहीतर आपल्यावर चोरीचा कलंक लागेल. आम्ही मालकाला फोन करून विनवणी केली, तर ते म्हणाले- दागिणे याच्याकडेच आहेत, यानीच ते चोरले आहेत, आम्हाला तर दागिणेच हवे आहेत. माझ्या पतीला त्यांनी मारण्याची धमकी दिली त्यामुळे ते खुप घाबरले. रस्त्यात घरी येत असताना त्यानी आम्हाला कालव्याजवळ नेले आणि आम्हाला ढकलून दिले आणि स्वत:नेही उडी मारली. 


महिलेला नाही माहित तिचा मुलगा मेला आहे
राजिंदरा रूग्णलयात भर्ती असलेल्या महिलेल्या वाटत आहे की, कालव्यात वाहून गेलेले मुलगा आणि पती परत मिळतील पण तिला सांगितले नाहीये की, तिच्या मुलाचा मृतदेह मिळाला आहे. पतीचा शोध पोलिस घेत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...