आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उस्मानाबादेत कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ ? डॉ. तानाजी सावंत, मोटेंसह चव्हाणांच्या नावाची चर्चा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
तानाजी सावंत (शिवसेना), राहुल मोटे (राष्ट्रवादी), मधुकर चव्हाण (काँग्रेस) - Divya Marathi
तानाजी सावंत (शिवसेना), राहुल मोटे (राष्ट्रवादी), मधुकर चव्हाण (काँग्रेस)

उस्मानाबाद - शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसने राज्यात सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांसह ग्रामपंचायतीवर वर्चस्व असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनुभवी नेत्यांना या मंत्रीमंडळात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. भूमचे माजी आमदार राहूल मोटे, तुळजापूरचे काँग्रेसचे अनुभवी नेते मधुकर चव्हाण यांच्याही नावाचा समावेश असण्याची शक्यता आहे.दुसरीकडे शिवसेनेत महत्वाचे स्थान निर्माण केलेल्या डॉ.तानाजी सावंत यांच्याकडेही महत्वाचे खाते येऊ शकते.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीमधून पक्षांतर  केल्यानंतर जिल्ह्याला पक्षासाठी चेहरा कोण, असा प्रश्न उपस्थित झाला होता.मात्र, निवडणुकीपुर्वी शरद पवार यांनी कार्यकर्ता मेळावा घेऊन पक्षात काहीही झालेले नाही, हे सांगण्याचा प्रयत्न केला. मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यानंतर पक्षाला पुन्हा बळ मिळणार,असे चित्र निर्माण झाले. मात्र,पक्षाकडे जिल्ह्यात ताकदीचा नेता नसल्याने निवडणुकीत दोन जागा गमावल्या.राहूल मोटे यांच्या १५ वर्षाच्या कार्यकाळात मतदारसंघात दखलपात्र काम झालेले नाही. उस्मानाबाद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय निंबाळकर यांना अवधी कमी पडल्यामुळे त्यांचाही पराभव झाला. मात्र,पराभूत उमेदवार राहूल मोटे यांच्यासह तुळजापूरचे मधुकर चव्हाण यांना मंत्रीपद किंवा महामंडळाचे पद मिळण्याची दाट शक्यता आहे. मधुकर चव्हाण हे काँग्रेसचे बुजुर्ग नेते असून, ते ४ वेळा सलग आमदार राहीले आहेत.   दुग्धविकास, पशूसंवर्धन, मत्स्यव्यवसाय या खात्याच्या मंत्रीपदाची तर विधानसभेच्या आमदार डॉ. तानाजी सावंतांना पुन्हा संधी ?

शिवसेनेत नेत्यांच्या पहिल्या यादीत डॉ. सावंत यांचे नाव आहे. भूम - परंड्यातून त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यांनी पक्षासाठी योगदान दिल्याने पक्षाकडून  मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. महायुती सरकारमध्ये ते काही महिने जलसंधारणमंत्री होते. पुन्हा एकदा त्यांना संधी मिळाल्यास पुन्हा संधी मिळू शकते.