Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | why-blown-up-dive-at-puja

पूजा करताना तुपाचा दिवाच का लावावा?

दिव्य मराठी टीम | Update - May 19, 2011, 03:32 PM IST

अज्ञानाचा अंधार मिटवून आपण आपल्या आय़ुष्यात ज्ञानाचा प्रकाश आणावा, यासाठी दिवा लावला जातो.

  • why-blown-up-dive-at-puja

    दिवा ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक आहे. पूजेच्यावेळी दिव्याचे विशेष महत्त्व आहे. अज्ञानाचा अंधार मिटवून आपण आपल्या आय़ुष्यात ज्ञानाचा प्रकाश आणावा, यासाठी दिवा लावला जातो. धर्मशास्त्रानुसार पूजेच्यावेळी देवाजवळ दिवा लावणे अनिवार्य मानण्यात आले आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी येते. यामुळे घरात स्थायी स्वरुपात लक्ष्मीचा वास असतो. दिव्याबरोबरच धर्मशास्त्रानुसार पूजेच्यावेळी पंचामृताचेही विशेष महत्त्व असते.

    पंचामृतात जे पाच पदार्थ मिसळण्यात येतात. त्यामध्येच तूप हा देखील एक पदार्थ आहे. त्यामुळे शुद्ध तुपाचा दिवा देवाजवळ लावला जातो.
    ज्योतिष शास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्रय दूर करणारे साधन मानण्यात आलंय. तुपाचा दिवा लावल्याने वास्तूदोष दूर होतो, असेही मानण्यात येते. गाईच्या तुपात वातावरणातील जंतू दूर करण्याची क्षमता असते. त्यामुळे अशा तुपाचा जेव्हा अग्नीशी संबंध येतो, त्यावेळी वातावरण एकदम पवित्र बनते. प्रदूषण दूर होते. दिवा लावल्याने संपूर्ण घराला त्याचा फायदा होतो. घरातील प्रदूषण कमी करण्यासाठीही शुद्ध तुपाच्या दिव्याचा उपयोग होतो.

Trending