आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकत्व कायदा समजावून सांगावासा का वाटला नाही : ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांचे परखड मत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद  : नागरिकत्वाचा कायदा आता मंजूूर केला आहे. जगात अनेक देशांत ताे आहेच. त्यातील मुख्य असं आहे की, ताे कायदा मंजूर करण्याआधी किंवा आणण्याआधी ताे कायदा काय आहे? हे देशातील जनतेला समजावून सांगण्याची सरकारला गरज का वाटली नाही? त्याकाळी आणीबाणी का आणली? हेदेखील सांगितलं नव्हतं? तुम्ही लाेकाशाहीत आहात ना? मग लाेकांशी चर्चा करा, मग कायदे संमत करा. पण, आपल्या देशात तसं हाेत नाही. रामायण-महाभारतापासून तेच सुरू आहे.धर्माच्या मुद्द्यावर कशी भांडणं करता येतील आणि सत्ता संस्थानं टिकवून ठेवता येतील हा सगळा विचार या मागे असल्याचे स्पष्ट मत ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांनी व्यक्त करतानाच देशात सध्या सुरू असलेल्या वैचारिक गाेंधळावर ताशेरे ओढले. ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सारंग दर्शने आणि दासू वैद्य यांनी रानडे यांना बाेलते केले.

बुरखा घालून बघितला अन‌् बाईचं मन कळलं

मी मुस्लिम महिलांच्या प्रश्नाशी जाेडले गेले. काबूलमध्ये असताना अफगाणी बायकांशी बाेलले तर त्या बायका म्हणत की, आता लग्न झालंय, पण माहिती नाही कधी तलाख हाेईल. त्याच वेळी मी स्वत: त्याचा बुरखा घालून बघितला. जीव कासावीस झाला. मला त्या बायकांचं मन कळलं. हमीद दलवाईंनी शाहबानाे प्रकरणासाठी माेर्चा काढला. त्यात सहभागी झाले. मग मी शहाबानूची बाजू घेऊ लागले. मला लाेकांनी विचारलं की, हिंदू आहात मुस्लिम महिलांसाठी एवढं काय करता? मी काेणी का असेना. बाई ही बाईच असते. तिचं हृदय एकच असतं. तिच्या मनात जी उलथापालथ चालते ती सारखीच असते. वसईच्या एका कार्यक्रमात मी ख्रिश्चन महिलांबद्दलही हेच बाेलले हाेते. पण तिथं त्यांना पटलं नाही. पण काही महिला मला येऊन भेटल्या. आम्हाला या विषयावर बाेलता येत नाही, तुम्ही बाेला, लिहा असं त्या म्हणाल्या.

दुर्गाबाईंशी मैत्री व वाद

दुर्गाबाईंशी पहिली ओळख एशियाटिक लायब्ररीत झाली. माझ्या सभासदत्वाच्या अर्जावर त्यांची सही आहे. मग पुढे दाेस्तीच झाली. त्यांच्याशी स्त्रीमुक्ती चळवळीसंदर्भात वादही झाले. त्यांच म्हणणं हाेतं कशाला हवी स्त्रीमुक्ती चळवळ? मी म्हणायचे का नकाे? आपले नवरे आपल्याला स्वातंत्र्य देतात, पण इतर अनेक स्त्रिया आहेत त्यांचं काय? मी काही काळ स्त्रीमुक्तीसाठी कामही केलं, पण नंतर ती चळवळ पराकाेटीला गेली. अतिरेक झाला. मग मी त्यापासून दूूर गेले.

खुशवंतसिंगांची आजी मराठी

खुशवंतसिंग यांच्या घरी गेल्यावरचा एक अनुभव प्रतिभाताईंनी सांगितला. त्या म्हणाल्या की, त्यांच्या घरी गेल्यावर बाजूलाच एक माेठा काेनाडा हाेता. त्यात गणपतीची मूर्ती हाेती. त्याविषयी खुशवंतसिंगांना विचारल्यावर ते म्हणाले की, आमची आजी मराठी हाेती. तिचं नाव 'ताना' आमच्यासाठी तानाजी. तिची आठवण म्हणून ही मूर्ती इथे घरात ठेवली आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं कसली आणता?

प्रत्येक लेखकाला जे आणि जसं वाटेल ते लिहिण्याचं स्वातंत्र्य असलंच पाहिजे. लिहिल्यानंतर मला धमक्या आल्या, पत्रं आली. पण म्हणून व्यक्त हाेणं थांबत नाही. सर्वसामान्य मुसलमानांना समजावून घेणार आहाेत की नाही?

बातम्या आणखी आहेत...